कौतुक करण्यापेक्षा बदनामीच अधिक केली; कर्जमाफीचा मुद्दा आमच्यामुळे जिवंत झालाय; आंदोलनावर टीका करणाऱ्यांवर बच्चू कडूंचा प्रहार, सगळंच काढलं!

मुंबईः- राज्यभरात आमच्या आंदोलनाचं कौतुक करण्यापेक्षा बदनामी अधिक केली जातेय. आम्ही मॅनेज झालो असं बोलताय, लाज वाटत नाही का? शेतकरी आंदोलन बंद करा, असे आमचे कार्यकर्ते म्हणतात. काहीजण मॅसेज करताय त्यांनी ते केल्यापेक्षा आंदोलनात सहभागी व्हा ना. आज आम्हाला आनंद आहे कर्जमाफीचा मुद्दा होता जो संपला होता, तो बच्चू कडूमुळे आज जिवंत झालाय. पण आमच्यावर कमेंट, आरोप आणि टीका करण्यापेक्षा गावा गावात आंदोलन उभं करा ना, अशा शब्दात खडेबोल सुनावत प्रहारचे सर्वेसर्वा बच्चू कडू यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *