कुडेगावात पुन्हा मुंगसाचा हल्ला, दोन महिला गंभीर

लाखांदूर : दोन महिन्यांपूर्वी गावात सलग घडलेल्या मुंगसाच्या हल्ल्यांची भीती अजूनही संपलेली नसतानाच पुन्हा एकदा मुंगसाने थैमान घातले आहे. शुक्रवार, २४ ऑक्टोबर रोजी सकाळच्या सुमारास घरगुती कामकाज करत असताना मुंगसाने दोन महिलांवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनेत लिला राऊत (६०) आणि अपेक्षा लाखडे (२०) या दोघी गंभीररित्या जखमी झाल्या असून त्यांच्यावर कुडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.

दोन महिन्यांपूर्वी कुडेगाव येथे झालेल्या हल्ल्यांत १० नागरिक जखमी झाले होते. काही दिवस शांततेनंतर पुन्हा अशी घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चन्ने यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक चंद्रशेखर जारवाल, डी. एस. झोडे, वनमजूर रवींद्र खरकाटे आणि प्रफुल राऊत यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी मुंगसाला जिवंत पकडून जाळ्यात घेतले आणि जंगल क्षेत्रात सुरक्षितपणे सोडून जीवनदान दिले. यासाठी गावातील तरुणांनी पुढाकार घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *