अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला
दै. लोकजन वृत्तसेवा सानगडी :- दोन दिवसात झालेल्या अति मुसळधार अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला आहे. धानाच्या कडप्पा अक्षरशः पाण्यात भिजल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खरीप पीक अंतिम टप्यात असताना दि. २४ व २५ ऑक्टोबरला अचानक अतिमुसळधार पावसाने हजेरी लावली. काही शेतकऱ्यांनी पुंजने तयार केले काहीनी कापणी केली तर काही शेतकऱ्यांनी धान सुकविण्यासाठी रस्त्याच्या कडेला किंवा खुल्या जागेत पसरविले. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे काहींचे पुंजने, धानाचे कडप्पा तर काहींचे सुकविण्यासाठी पसरविलेले धानाचे मोठ्या प्रमाणात नासाडी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले.
आज सानगडी येथील शेतशिवारात अनेक शेतकऱ्याची विदारक परिस्थिती दिसून आली. एकीकडे कर्ज काढून शेतीचा हंगाम करणाऱ्या शेतकऱ्यावर उभे झालेले आसमानी संकट आर्थिक विवेंचनात भर पाडणारे असून जगावे की मरावे या विवेंचनात शेतकरी सापडला आहे. प्रत्यक्ष नुकसानग्रस्त धान पिकांचे पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई देण्याची मागणी सानगडी सरपंच सविता उप्रीकर, सासरा येथील सरपंच योगराज गोटेफोडे, विहीरगावचें सरपंच दमयंती उप्रीकर, सिरेगावं येथील उपसरपंच दादा संग्रामे, हंसराज रामटेके, सुधीर मांडवटकर, गणेश झिंगरे, मनोहर लोथे इत्यादीनी केली आहे.







