विभागीय नाट्योत्सवात नूतन कन्या शाळा प्रथम
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- विभागीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग, नागपूरच्या वतीने आयोजित विभागस्तरीय राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सव २०२५-२६ रमन विज्ञान केंद्र, नागपूर येथे आयोजित करण्यात आले. मुख्य विषयास अनुसरून यात नूतन कन्या शाळेच्या चमुने “सर्वांसाठी स्वच्छता’ या विषयावर प्रवचनातून उत्कृष्ट नाट्य सादरीकरण केले. विषयाला अनुसरून वेशभूषा, स्वच्छता विषयक जनजागृती, वैज्ञानिक दृष्टिकोन इत्यादींचे उत्कृष्ट प्रदर्शन करून नूतन कन्या शाळेच्या चमुने विभागस्तरावर या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. यात नारायणी गिऱ्हे, स्वरा मुनिश्वर, स्वरा रंभाळ, गारवी चरडे, रूद्राणी शेण्डे, पलक डोळस, श्रावणी बनकर, स्वरा गायधने या विदयार्थिनी सहभागी होत्या. या नाटिकेकरिता शाळेतील शिक्षिका रोहिणी मोहरील यांचे नाट्यलेखन, संवाद, दिग्दर्शन कलाभिनय याकरिता उत्तम मार्गदर्शन लाभले. त्यांना शिक्षक शितल नागपुरे, प्रांजल मालगावे यांचे तंत्रसहाय्य व सहकार्य लाभले.
या विज्ञान नाट्योत्सवाकरिता शाळेच्या मुख्याध्यापक निलु तिडके यांचे प्रोत्साहन, मार्गदर्शन व नियोजन मोलाचे ठरले. न्यू गर्ल्स स्कूल भंडारा चे अध्यक्ष ॲड. एम. एल. भुरे, संस्थासचिव शेखर बोरसे, मंगला गोतारणे शिक्षणाधिकारी माध्यमिक, जि. प. भंडारा, रविन्द्र सोनटक्के शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि. प. भंडारा, मनिषा गजभिये, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक, जि. प. भंडारा, रविन्द्र मोडेमवार, शिक्षण उपनिरीक्षक जि. प. भंडारा, प्रशांत मिश्रा, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, जि. प. भंडारा यांनी या यशाबद्दल यशस्वी विदयार्थिनी, मार्गदर्शक शिक्षक व मुख्याध्यापक यांचे अभिनंदन व कौतुक करून राज्यस्तरीय स्पर्धेकरिता तसेच यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या.







