ग्रामीण भागात मंडईनिमित्त आले जत्रेेचे स्वरुप

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भाऊबिजेच्या दिवसापासून मंडईचा उत्सव सुरु झाला असून शहरातील नागरिक ग्रामीण भागाकडे वळू लागली आहे. याप्रसंगी लोककलांचे प्रदर्शन मंडईमध्ये होत असते. रुपेरी-चंदेरी दुनियेचा या लोककलांना चांगलाच फटका बसत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसू लागले आहे.

दिवाळीतील बलीप्रतिपदेचा दिवस संपताच भाऊबिजेच्या दिवसापासून मंडई उत्सवाला सुरुवात होतो. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी शेती हंगामाला अनुसरून या उत्सवाची निमित्र्त्ाी केल्याचे सांगितले जाते. ऑक्टोंबर-नोव्हेंबर महिन्यात खरिपाचे पीक हातात येते व याचा आनंदोत्सव साजरा करण्याचा मंडई हा माध्यम आहे. वर्षभर शेतात राबणारा शेतकरी मंडईत अनेक प्रकारची खरेदी करतो, याशिवाय मंडईत मनोरंजनासाठी नाटक, तमाशा, खडीगंमत, दंडार, गोंधळ यासारख्या लोककलाचे आयोजन केले जाते.

झाडीपट्टीची दंडार ही लोककला राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहचली आहे. दंडार ही अनेक लोककलांची जननी मानली जाते. ग्रामीण भागात जेव्हा अन्य कुठलीही मनोरंजनाची साधने नव्हती, तेव्हा दंडारीची उत्पत्ती झाल्याचे बोलले जाते. रेडीओ, टिव्ही, सिनेमाघर ही मनोरंजनाची साधने आल्यापासून आता मात्र या लोककलांना अखेरची घरघर लागली आहे. मंडई हा केवळ मनोरंजनाचा स्त्रोत नसून, लोकांसाठी नवीन नातेसंबंध जोडण्यासाठी आणि लग्न जुळविण्याचे देखील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. मंडईनिमित्त जवळपासच्या नातेवाईकांकडे जाऊन पाहूणचार घेण्याचा परंपरा आजही काही प्रमाणात सुरु असली तरी वाहतुकीची साधने, रस्ते यामुळे नातेवाईकांकडे रात्री मुक्काम करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

कामाच्या व्यवस्ततेेमुळे सुद्धा मंडईत सहभागी होणाऱ्याचे प्रमाण कमी झाले आहे. रात्री मुक्कामी असणारे पाहुणे मंडळी गावात आयोजित या लोककलांचा आस्वाद घेत असत. अनेक ठिकाणी उपवर मुला-मुलींचे विवाह ठरवण्यासाठी मंडई हे उत्कृष्टमाध्यम ठरत होते. कालानुरुप आता या गोष्टी कालबाहय होत आहेत. ग्रामीण भागातील मंडई व त्यात प्रदर्शित होणाऱ्या लोककला यांचे आकर्षण कमी होत असल्याने प्रतिसाद कमी मिळत असला तरी मंडईची आयोजन मात्र सुरुच आहेत. विशेष म्हणजे प्रत्येक गावातील मंडईची तिथी ठरलेली असते. भाऊबिजेचा दिवस व त्यानंतरच्या ठरलेल्या दिवशीच मंडईचे आयोजन केले जाते. ग्रामीण लोककलांची आवड दिवसेंदिवस कमी असली तरी या क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांची “कला’ जोपासण्यासाठी धडपड सुरुच आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *