धंगेकरांवर कारवाई करायची मग नवी मुंबईत काय? उदय सामंतांचा एकनाथ शिंदेंविरोधात रान उठवलेल्या गणेश नाईकांना अप्रत्यक्ष खोचक टोला!

मुंबईः- “रवींद्र धंगेकर यांच्या सोबत मी स्वतः बोलणार आहे. त्यांना भेटायला जाणार आहे. त्यांनी संयम बाळगला पाहिजे, तसा बाकीच्या नेत्यांनीही बाळगला पाहिजे.’ तसेच, “धंगेकर यांच्यावर कारवाई करायची असेल, तर मग नवी मुंबईत काय घडलं हेही पाहावं लागेल. कोणी सुरुवात केली हे सर्वांना माहीत आहे,’ असे म्हणत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी अप्रत्यक्ष वनमंत्री गणेश नाईकांवर तोफ डागली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शेलक्या शब्दात गणेश नाईक यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्याकडून कारवाई केली जाणार अशी चर्चा सुरु झाली होती, त्याला एक प्रकारेपूर्णविराम देण्याचा प्रयत्न उदय सामंत यांनी केला आहे का? असाही सवाल केला जात आहे. जैन बोर्डिंग प्रकरणात धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप केले असून संबंधित जागेच्या व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती देण्यात आली आहे. रवींद्र धंगेकर यांनी ट्विटबॉम्ब दररोज फोडत असून त्यांनी कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नसल्याचे म्हटल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *