१५० पेक्षा अधिक युवकांनी स्वीकारले आमदार भोंडेकरांचे नेतृत्व

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात बेला व भंडारा शहरातील १५० पेक्षा अधिक युवकांनी आम. नरेंद्र भोंडेकरांचे नेतृत्व स्वीकारत शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश आज संपूर्ण दिवस भंडाऱ्यात चर्चेचा विषय असून आणखी पुढे कीती प्रवेश होतील असा सवाल नागरिकांच्या मनात सुरू राहील. या प्रवेशा दरम्यान शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल गायधने उपस्थित होते. शिवसेना उपनेते आम. नरेंद्र भोंडेकर यांच्या द्वारे गेल्या पाच वर्षात केल्या गेलेल्या कामांची चर्चा आता संपूर्ण पूर्वविदर्भात होऊ लागली आहे. अश्यात विकास कामांसह पक्ष मजबूती चे कार्यही जोमत सुरू आहे. ज्या मुळे पक्षात प्रवेश करणाऱ्यांची एकाच गर्दी लागली आहे.

याच शृंखलेत आज १५० पेक्षा अधिक युवक आम. भोंडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात पोहोचले आणि त्यांचे नेतृत्व स्वीकारीत शिवसेनेत प्रवेश केला. या वेळी आम. भोंडेकर यांनी शिवसेनेचा दुपट्टा घालून त्यांचे स्वागत केले. युवकांनी सांगितले की आम. भोंडेकर यांच्या द्वारे केले जात असलेले कार्य हे दूरदृष्टि ठेऊन होत आहे. आज सुरू असलेल्या प्रकल्पामुळे भविष्यात आमच्या सारख्या युवकांना रोगजरची संधि उपलब्ध होणार असून भंडाऱ्याचे नाव जागतिक पातळीवर पोहोचणार आहे. त्यांच्या या दुरदृष्टिकोणाशी प्रभावित होऊन त्यांचे नेतृत्व सिकरले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *