चांदोली बिटातवाघाच्या हल्ल्यात इसम जखमी

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- वनपरिक्षेत्र लाखनी येथील सहवनक्षेत्र उमरझरी बिट चांदोरी अंतर्गत नियत क्षेत्र कीन्ही/एकोडी येथे (ता.१८) रोज शनिवारला दुपारच्या सुमारास आपल्या शेतावर पाळीव प्राण्यांसाठी तनिस आणायला गेला असता दबा मारून बसलेल्या वन्यप्राणी वाघाने अचानक हल्ला केल्याने इसम किरकोळ जखमी झाला.ब्रिजलाल शेगो हरिनखेडे रा.कीन्ही/ एकोडी ता.साकोली असे आहे.किरकोळ जखमी झाल्याने त्याला गावकऱ्यांनी साकोली येथील उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी नेण्यात आले.असून त्याच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकुर्ती स्थिर आहे.

ब्रिजलाल हा अल्पभूधारक शेतकरी असून तो कुटूंबाची उपजीविका चालविण्यासाठी पशुपालनाचा व्यवसाय करतो घरातील कमावता पुरुषावर अचानक वाघाने हल्ला केल्याने गावकऱ्यांनी आर्थिक मदत व औषधी खर्च पुरविण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.इसमावर वाघाने हल्ला केल्याची माहिती वनविभागाला मिळाल्याने जखमींची विचारपूस करण्यासाठी दवाखान्यात दाखल झाले त्यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी नितेश धनविजय लाखनी,सहवन क्षेत्र अधिकारी प्रवीण ढोले उमरझरी,बिट रक्षक कु.टी.डी.वरकडे चांदोरी, बिटरक्षक बालू जवंजार उमरझरी, बिटरक्षक सचिन राणे वलमाझरी, वनमजुर गुलाब तुप्पट यांनी जखमी इसमाचा विचारपूस करून पंचनामा करण्यात आला व मौकास्थळावर जाऊन ट्रैप कॅमेरे लाऊन पंचनामा नोंद करुन कार्यवाही केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *