शासकीय योजना घराघरापर्यंत पोहोचवा-आ. राजू कारेमोरे

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- कार्यकर्त्यांनी शासकीय योजना घराघरापर्यंत पोहचवून सर्वसामान्य जनतेला त्या योजनांचा लाभ मिळवून द्यावे असे आवाहन तुमसरमोहाडी विधानसभा क्षेत्राचे आमदार राजूभाऊ कारेमोरे यांनी केले. महादेव मंदिर (लोढ्याचे) कुशारा रोड मोहाडी येथे आज दि. १८ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खा. प्रफुल पटेल यांच्या निर्देशान्वये मोहाडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा सभा घेण्यात आली. यावेळी बोलतांना आ.राजूभाऊ कारेमोरे यांनी वरील आवाहन केले.

सभेत माजी आमदार राजेंद्र जैन, जिल्हाध्यक्ष नानाभाऊ पंचबुद्धे, प्रदेश सचिव धनंजय दलाल, आ. राजू कारेमोरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, जयंत वैरागडे, महाराष्ट्र प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्ष सौ. रिताताई हलमारे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ. सरिता मदनकर, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष यशवंत सोनकुसरे, विधानसभा अध्यक्ष देवचंद ठाकरे, मोहाडी तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वरिष्ठांनी मोहाडी तालुक्याचा आढावा घेतला. तालुका अध्यक्ष सदाशिव ढेंगे यांनी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने सुरु असलेल्या कार्याची माहिती दिली. वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस घराघरात पोहचविण्याचे निर्देष दिले. सभेला मोहाडी तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे सर्व तालुका पदाधिकारी,महिला पदाधिकारी, शहर प्रमुख, जिल्हा परिषद सर्कल प्रमुख, जिल्हा परिषद सभापती, जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सभापती, पंचायत समिती सदस्य, पंचायत समिती सर्कल प्रमुख, नगरपंचायत सभापती, नगरसेवक, युवक/युवती प्रमुख सरपंच, महिला पदाधिकारी, बूथ प्रमुख, बूथ सदस्य,सेवा सहकारी संस्था पदाधिकारी, ग्रामपंचायत पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *