जयश्री बोरकर यांची पुन्हा काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या भंडारा जिल्हा महीला अध्यक्षपदी पुन्हा एकदा सौ. जयश्री बोरकर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. ही ते करीत असलेल्या कामांची पावतीच आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या ऑल इंडिया महीला काँग्रेसच्या सभेत काँग्रेसच्या राष्ट्रीय महीला अध्यक्ष अलका लांबा यांनी संपुर्ण महाराष्ट्र तसेच इतर राज्याचे देखील महिला जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर केले आहेत.
भंडारा जिल्हा महीला अध्यक्षपदी जयश्री बोरकर हे गेल्या अनेक वर्षापासुन कार्यरत होत्या. परंतु विधानसभेनंतर राज्यातील महीला अघाडीला बरखास्त करण्यात आले होते. या दरम्यान देखील जयश्री बोरकर यांनी पक्षाचे व सामान्य नागरीकांचे कार्य सुरुच ठेवले होते. या सर्व बाबींचा विचार करता महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या अलका लांबा यांनी पुन्हा नव्याने जयश्री बोरकर यांच्यावर विश्वास दाखवीत महिला जिल्हाध्यक्षपदी विराजमान केले आहेत. सौ. जयश्री बोरकर यांच्या नियुक्तीने काँग्रेस तसेच महिला काँग्रेसमध्ये खुशीचे वातावरण तयार झाले आहे. भंडारा नगराध्यक्ष पदाची उमेदवारी सुध्दा त्यांनाच मिळणार असल्याची चर्चा आहे.









