घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी अटक – सोने चांदीचे दागिने व इतर साहित्य व मुद्देमाल हस्तगत
गोंदिया:- तक्रारदार श्रीमती नवीन राजेश मोहनकर वय ४० वर्ष रा. नवेगाव ता जि गोंदिया जि गोंदिया यांनी पोलीस ठाणे दवनिवाडा येथे तक्रार दिली कि ६ ऑक्टोंबर २०२५ चे रात्री ०८. ०० वाजता ते १०. ०० वाजता दरम्यान मोहल्यात घराजवळ शारदा मातेची आरती असल्याने मुलगा लोकेश व स्वतः गेले आरतीमध्ये गेले असता रात्री १०. ०० वाजता सुमारास परत आले असता त्यांचे घराचा दरवाजा उघड दिसल्याने घरात जाऊन पाहणी केली असता कोणीतरी अज्ञात चोरट्यानी त्यांचे नवेगाव येथे राहते घरातून सोने व चांदीचे दागिने,
नगदी व इतर साहित्य चोरून नेल्याचे फिर्यादी यांचे तक्रारीवरून पो. ठाणे दवनिवाडा येथे ७ ऑक्टोंबर २०२५ रोजी अपराध क्र. ४७९/ २०२५ कलम ३०५(ए) भारतीय न्याय संहिता नुसार गुन्हादाखल करण्यात आला होता व अज्ञात आरोपीचा शोध सुरु होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक सदर गुन्ह्याचे समांतर तपास करीत असताना दिनांक १७ ऑक्टोंबर २०२५ रोजी प्राप्त तांत्रिक माहिती तसेच पोलीस पथकास मिळालेल्या गोपनीय खात्रीशीर माहिती मिळाली की, कार्तिक दीनदयाळ मोहनकर राहणार नवेगाव याने सदर घरफोडी केल्याची माहिती प्राप्त झाल्याने कार्तिक दीनदयाळ मोहनकर राहणार नवेगाव याचे शोध घेतले असता तो गावीच मिळून आला त्यास विश्वसात घेऊन विचारपूस केले असता त्याने सांगितले की,
६ ऑक्टोंबर २०२५ रोजी रात्री ०८. ०० ते १०. ०० वाजता दरम्यान फिर्यादीचे घरी कोणीही हजर नसताना सुना मोका पाहून चोरी केल्याचे सांगितले व गुन्हाकेल्याचे कबुल केल्याने त्यांचे ताब्यातून खालीलप्रमाणे गुन्हयात चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. मंगळसुत्र एकुण वजन अंदाजे ५ ग्रॅम कि.अ. ५०,०००/-रु, एक जोड पिवळ्या धातुचे झुमके वजन अ. ३ ग्रॅम कि.अ.३०,०००/ – रु, दोन नग पांढ-या धातुचे चैन एकुण वजन २० ग्रॅम कि.अ.२०००/- रु, एक जोड पांढ-या धातुचे पायल वजन अ. १२० ग्रॅम कि.अ १२,०००/रु, एक पांढऱ्या धातुचे करदन वजन अ. ३० ग्रॅम कि.अ ३,०००/-रु, एक जोड पांढऱ्या धातुचे जोडवे वजन अ. ५ ग्रॅम कि.अ ५००/-रु, एक पांढऱ्या धातुचा आकडा वजन अ. १० ग्रॅम कि. १,०००/-रु, असा एकुण किंमती ९८५००/-रु. चा मुद्देमाल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आले आहे.
आरोपींस पोलीस ठाणे दवनिवाडा पोलीसांचे स्वाधीन करण्यात आले असून पुढील कायदेशीर कारवाई प्रक्रिया दवनिवाडा पोलीस करीत आहेत. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक गोंदिया, गोरख भामरे, अपर पोलीस अधीक्षक गोंदिया अभय डोंगरे यांचे निर्देश सूचनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पुरुषोत्तम अहेरकर यांचे मार्गदर्शनात पोलीस पथक मपोउपनि वनिता सायकर पोहवा. रियाज शेख, पोहवा. सुबोध बिसेन, पोहवा. इंद्रजित बिसेन,पो.शि. संतोष केदार, चालक पोशि घनश्याम कुंभलवार स्थानिक गुन्हे शाखा, गोंदिया यांनी कारवाई केलेली आहे.









