विदर्भ शाहीर कलाकार परिषद कला नागपूर आयोजन
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- विदर्भ शाहीर कलाकार परिषद करणार नागपूर अंतर्गत जिल्हा भंडारा द्वारा आयोजित ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जिल्हास्तरीय सांस्कृतिक महोत्सव भारत सभागृह साकोली येथे घेण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी नगरसेवक मनीष कापगते होते तर प्रमुख अतिथी म्हणून माजी नगरसेवक रवी परशुरामकर, धनवंता राऊत, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते व समाजभूषण डी. जी. रंगारी, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर सपाटे, केंद्रीय कार्याध्यक्ष अलंकार टेंभुर्णे, एशियन न्यूज चॅनेल चे अंकर शीतल नागदेवे, भंडारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष डॉ. रामनाथ पारधीकर, केंद्रीयकोषाध्यक्ष मिलिंद खोबराकडे, तालुकाध्यक्ष केशव फसाटे, तालुका अध्यक्ष मारुती मेश्राम, मानधन निवड समितीचे ज्योती वाघाये, प्रभाकर लिचडे, वसंता कुभरे, जिल्हा उपाध्यक्ष नाशिक राहुले, अशोक खोमणे, रमेश रामटेके व इतरही मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला सर्व मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की जे जुन्या पारंपारिक गोष्टी आहेत
ढाका असेल जात्यावरच्या नृत्य असेल किंवा मुरसाने ते कांडण असेल तर विविध पद्धतीचे कलाकार कलाकृती दाखवून आपली पारंपरिक संस्कृती टिकवण्याचे काम या कलाकाराच्या माध्यमातून मोठ्या संख्येने होत असते आणि पूर्ण जिल्ह्यातील जिल्ह्याच्या बाहेरील कलाकार चांगल्या पद्धतीने आपले नृत्य कला साजरी करत असतात अनिल असे मनोगत मान्यवरांनी व्यक्त केले कार्यक्रमात विदर्भातील नाटक तमाशा नौटंकी नाटक गोंधळभारुड कलापथक दंडार कीर्तन भजन गायन वादक नकलाकार नृत्य शाहिरी पोवाडा जात्यावरचे गाणे हरवण्याचे गाणे असे विविध सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यक्रम सदर मेळाव्यात सादर करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामनाथ पारधीकर यांनी केले संचालन मिलिंद खोब्रागडे यांनी केले तर आभार श्रावण विषयी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता कोमल बोंद्रे, रंजना येडे, श्यामलाल लिचडे, रमेश तिडके, रमेश रामटेके, तुलाराम लांजेवार, गोंदिया जिल्हाध्यक्ष वसंता कांबळे, सुधीर लांडे, राहुल लाजेवार, विश्वनाथ जमकाडे देवनाथ पटले, नंदा वाघे, मुरली केशवराव चांदेवार व इतरही कार्यकर्ते याप्रसंगी मेहनत घेतली.









