ऐन दिवाळीत एसटी आरक्षण प्रणाली ठप्प, नव्या सॉफ्टवेअरचा प्रवाशांना नाहक त्रास, कर्मचारीही वैतागले

मुंबई:- ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटीने गावी जाणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचं दिसून येतंय. एसटी आरक्षण प्रणाली ठप्प झाल्याने प्रवास कसा करायचा असा प्रश्न आता पडला आहे. आरक्षण प्रणाली ठप्प झाल्याचा फटका प्रवाशांसह एसटी महामंडळालाही बसत असल्याचं चित्र आहे. तसेच नवीन प्रणालीमुळे कर्मचारीही वैतागले आहेत.

एसटी आरक्षण प्रणाली सॉफ्टवेअर आणि कंपनीमध्ये दोन वर्षाआधी महामंडळाने बदल केला आहे. त्या माध्यमातून जुन्या आरक्षण प्रणालीच्या जागी नवीन आरक्षण प्रणाली आणली. पण सदर प्रणाली ही सोयीस्कर होण्याऐवजी जास्तच किचकट होत असल्याचं चित्र आहे. ऐन दिवाळीच्या मोक्यावरती आरक्षण प्रणाली पूर्ण बंद पडली असून प्रवाशांना नाहक त्रास होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *