भरधाव स्कूल व्हॅन पलटून ६ विद्यार्थी व १ पालक जखमी, भंडारा तालुक्यातील सुरेवाडा येथील घटना

भंडारा :- जिल्ह्यातील सुरेवाडा येथे भरधाव स्कूल व्हॅन पलटी आल्याने भीषण अपघात आला. या अपघातामध्ये ६ विद्यार्थी व १ पालक किरकोळ जखमी झालेत. जखमींना उपचारांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे भरती करण्यात आले. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे.
जखमी विद्यार्थ्यांची नावे अवेंद्र योगेश भोयर रा. माटोरा, सानिध्या रामप्रकाश चोपकर रा. खमारी. उर्वेश दिपक बेदरकर रा. मांडवी, सानवी दिपक बेदरकर रा. मांडवी, रुद्रानी उमेश बेदरकर रा. मांडवी व गर्ग ईश्वर मेश्राम रा. माटोरा असे असून जखमी पालकाचे नाव उमेश पंजाब मेश्राम (वय २०) रा. मांडवी असे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सावित्रीबार्ड इंग्लिस स्कुल कारधा ही शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी मारुती स्कूल व्हॅन क्र. एमएच ४७ बीबी ५८६४ ने घरी परतत होते. याचवेळी रस्त्यावरील खड्ड्यांना चुकवण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटले आणि स्कूल व्हॅन पुलावरून खाली कोसळली. सुरवाडा येथे हा अपघात झाला. यात ६ विद्यार्थी तर १ पालक जखमी झाले. एका विद्यार्थ्यांचा दात पडला तर एकाच्या गालाला जखमी आली. याची माहिती मिळताच कारधा पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुर्यवंशी ताफ्यासह घटनास्थळी धाव घेत जखमी विद्याथ्यांना सामान्य रुग्णालय येथे पाठविले. त्यांच्यावर उपचार करून सुट्टी देण्यात आली. एक विद्यार्थी रुग्णालयात भरती आहे. यावेळी घटनास्थळी व रुग्णालयात विद्यार्थ्यांच्या पालकांची मोठी गर्दी झाली होती. सावित्रीबाई फुले स्कूल कारधा येथील प्राचार्य व शिक्षकवृंद उपस्थित होते.









