देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला, नक्षलवादी भूपती शरण आला, ६० नक्षलवाद्यांच्या समर्पणाची इनसाईड स्टोरी
गडचिरोलीः- माओवाद विरोधातील लढ्याला आज मोठं यश प्राप्त झाले आहे. माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याने त्याच्या ६० सहकाऱ्यांसह १५ ऑक्टोंबर रोजी गडचिरोलीत आत्मसमर्पण केलंय. राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा औपचारिक आत्मसमर्पण सोहळा गडचिरोलीत पार पडतो आहे. असे असताना, भूपतीने शरणागती पत्करण्यापूर्वी एक अट घातली होती, की तो शरणागती फक्त महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या समोरास पत्करेल आणि मुख्यमंत्र्यांनीही भूपतीने शरणगतीचा निर्णय घेतल्यानंतर आज त्यांचे सर्व प्रमुख कार्यक्रम बाजूला ठेवले आणि महाराष्ट्राच्या वतीने पोलीस आणि त्यांच्या मध्यस्थांनी जो शब्द भूपतीला दिला होता, तो शब्द १५ ऑक्टोंबर रोजी मुख्यमंत्री गडचिरोलीला येऊन पाळतआहेत.









