चिवाच्या पत्राची खंडविकास अधिकाऱ्यांनी घेतली दखल; आदेश निर्गमित

दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा :- पंचायत समिती तुमसरचे खंडविकास अधिकारी नंदकिशोर वाडेकर यांनी विदर्भ प्रदेश सचिव खेमराज शरणांगत यांच्या पत्राची दखल घेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व इतर देयके दिवाळीपूर्वी देण्यात यावे असे तडका फडकी लेखी आदेश १३ ऑक्टोंबर रोजी तुमसर तालुक्यातील ग्रामसेवकांना निर्गमित केले आहे.

दिवाळीपूर्वी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर पंचायत समिती तुमसरचे खंडविकास अधिकारी यांनी तात्काळ दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन उभारू असा खरमरीत इशारा १० ऑक्टोंबर रोजी प्रदेश सचिव खेमराज शरणांगत यांनी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग जिल्हा परिषद भंडारा व खंडविकास अधिकारी पंचायत समिती तुमसर यांना दिले होते. ग्रामपंचायत कर्मचारी हा अल्पशा वेतनावर काम करूनही सहा- सहा महिने वेतन न मिळाल्यामुळे दारिर्द्य नारायणाचा अवतार म्हणून जगत आहे.

शासनाच्या विविध व जन कल्याणकारी योजना राबविण्यात ग्रामपंचायत कर्मचारी हाच महत्त्वाची भूमिका बजावत असतो. तरी सुद्धा काही ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिव हिटलरशाही प्रवृत्तीचा वापर करून मानसिक त्रास देत असतात अशी तक्रार सुद्धा शरणांगत यांनी केली आहे. वेळेवर वेतन न देणे, वेतना बरोबरच राहणीमान भत्त्याची रक्कम न देणे, वेतनातून कपात झालेली भविष्य निर्वाह निधीचा अर्धा हिस्सा कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा न करणे, सानुग्रह निधी, प्रोत्साहन निधी न दणे तसेच जीवाची पर्वा न करता कोविड १९ सी निगडित इतर कामे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी केली आहे तरी सुद्धा त्यांचेवर दुर्लक्ष केले जात आहे.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मानधना व्यतिरिक्त १००० रुपये प्रति महिना प्रोत्साहनपर अदा करणे असे शासनाचे स्पष्ट आदेश असुन सुद्धा ती रक्कम ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना अद्यापही मिळाली ती देण्यात यावी या मागणीचे पत्र देण्यात आले होते. जर दिवाळीपूर्वी वरील मागण्यांची पूर्तता झाली नाही तर पंचायत समिती तुमसर समोर आंदोलन उभारू असा खरमरीत इसारा सुद्धा खेमराज शरणांगत यांनी दिला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *