ट्रॅक्टरला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु
मोहाडी :- ट्रॅक्टरला मागुन धडक दिल्याने एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यु झाल्याची घटना १४ आक्टोंबर रोजी सायं सात वाजता डोंगरगांव रस्त्यावर घडली. संजय प्रभुदास खोब्रागडे (३५) रा. सालईखुर्द असे मृतकाचे नांव आहे. संजय खोब्रागडे हा मोहाडी तहसिल कार्यालयात अर्जनविसाचे काम करीत होता.

काम आटोपुन तो गावाकडे मोहाडी- डोंगरगांव रस्त्याने सायंकाळी सात वाजता आपल्या गावाकडे जात होता. त्याच वेळी समोर थोड्या अंतरावर एका दुचाकी स्वाराला हरणीने धडक दिल्याने तो खाली पडला. त्यामुळे त्याच्या मागे असलेल्या ट्रॅक्टर चालकाने अचानक ट्रॅक्टर थांबविला. ट्रॅक्टरच्या मागे असलेल्या मृतकाचा आपल्या दुचाकीवरून ताबा सुटल्याने तो सरळ ट्रॅक्टर वर जाऊन धडकला. त्याच्या कपाळाला मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तपास आंधळगाव पोलीस करीत आहेत.









