मनसे-मविआच्या दोन शिष्टमंडळांनी घेतली भेट; एक शिष्टमंडळ चोकलिंगम यांच्या भेटीला तर दुसरं दिनेश वाघमारेंच्या भेटीला, कोण काय म्हणालं, मागण्या काय?
मुंबई:- महाविकास आघाडी आणि मनसे यांची एक नव्हे तर दोन शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतली. यातील एक शिष्टमंडळ मुख्य अधिकाऱ्यांना भेटलं तर दुसरं शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाला भेटलं आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर आता महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुका लागणार आहेत. त्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रिया निकालाच्या अडचणी आणि मतदार यादीमधील घोळ यावरती या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे.
आगामी महानगरपालिका आणि स्वराज्य संस्था निवडणुका पारदर्शक पद्धतीने पार पाडाव्या यासाठी ही भेट घेतली आहे आणि महाविकास आघाडीसह मनसेच्या शिष्टमंडळातील राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शेकापचे जयंत पाटील, शरद पवार, जयंत पाटील, हे प्रमुख नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी, एस. चोकलिंगम यांना भेटले. तर यातील एक शिष्ट मंडळ सीईअोंच्या भेटीला गेले आहे. दुसऱ शिष्टमंडळ अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात भेटून आले आहे.
या बैठकीमध्ये महाविकास आघाडीसह राज्यातील इतर विरोधी पक्षातील प्रमुख नेते देखील उपस्थित होते. चोकलिंगम यांच्या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, संदीप देशपांडे, जयंत पाटील हे देखील उपस्थित होते. शेकापचे जयंत पाटील, जयंत पाटील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात वर्षा गायकवाड यादेखील उपस्थित होत्या. आज सर्वपक्षीय शिष्टमंडळ निवडणूक आयोगांच्या मुख्य अधिकाऱ्यांचे भेट घेणार आहे तसेच दुसरे एक शिष्टमंडळ राज्य निवडणूक आयोगाचे दिनेश वाघमारे यांची भेट घेणार आहे, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली होती. दिनेश वाघमारे यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळामध्ये अंबादास दानवे यांचे हे शिष्टमंडळ आयोगाच्या भेटीला गेले होते. शिष्टमंडळांनी भेटीवेळी निवडणूकअधिकाऱ्यांना एक निवेदन दिले असून त्यातूनही काही खरमरीत सवाल विचारण्यात आले.
सर्व पक्षाचे शिष्टमंडळ १४ ऑक्टोंबर रोजी सगळे एकत्र आले. सगळेजण राज्य मुख्यनिवडणूक अधिकारी यांच्या सोबत बैठक घेतली. दुसर शिष्टमंडळ अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात भेटून आले आहे. आज चोकलिंगम आणि वाघमारे यांच्यात एकत्रित बैठक होणार आहे. आज पुन्हा चर्चा होणार आहे. त्यामुळे आज पत्रकार परिषद होईल. आज पत्रकार परिषद होणार नाही असं महाविकासआघाडी आणि मनसेकडून सांगण्यात आलं आहे.









