जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा, पवनी व तुमसर ह्या तिन्ही नगर परिषदेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची शिवसेनेची तयारी पूर्ण झाली आहे. पण वरिष्ठांनी युतीचा निर्णय घेतल्यास त्यासाठी सुद्धा आम्ही तयार आहोत. नगराध्यक्षाचे उमेदवार वेळेवर ठरवू अशी माहिती आ. नरेंद्र भोंडेकर यांनी आज विश्रामगृहात घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली. दिवाळी पूर्व संध्येला खांब तलाव भंडारा येथे श्रीरामांच्या मूर्तीसमोर ५१ हजार दिवे पेटविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. आ. नरेंद्र भोंडेकर पुढे म्हणाले.

नगर परिषद निवडणूकीच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढविण्याचा आमचा प्रयत्न आहे. प्रत्येक पक्षाचा उद्देश हाच असतो. युतीचा निर्णय वरिष्ठ स्तरावरचा आहे. आम्ही विकासासाठी निवडणूक लढणार आहोत. विरोधकांचा विरोध करायचे काम आहे. आम्ही मात्र जे वातावरण खराब करण्याचे काम करतात त्यांच्याकडे लक्ष न देता आपले विकासाचे काम करीत आहोत व करीत राहणार. पावसाळ्यामुळे भंडारा शहरातील अनेक रस्त्याची तसेच विकास कामे मंदावली होती. निधीची सुद्धा कमतरता होती. आता मात्र निधीची कमतरता नाही. त्यामुळे मंदावलेली कामे पुन्हा सुरु होत आहेत. खांब तलाव, जलपर्यटन, गटार योजना, पाणी पुरवठा यासह इतर कामे दोन महिन्यांत पूर्ण होतील, अशी आशा आहे. भंडाराचा अभिमान वाढविणारे हे कामे आहेत. कधी नव्हे एवढा निधी आपण भंडारापवनी विधानसभेसाठी आणलेला आहे.

विरोधक अफवा पसरवित आहे. नागपूर नाका ते राजीव गांधी चौक हे काम लवकरच सुरू होतील. गटार योजनेचे काम पहिल्यांना पूर्ण होणे आवश्यक होते. लवकरच ते काम पूर्ण होतील. त्यानंतर गटाचे काम पहिले होते आवश्यक आहे. हे काम करताना त्रास होतच असते. काम पूर्ण होताच एक ते दिड महिन्यात शहरातील सर्व रस्ते चांगले होतील. माझ्या विधानसभा क्षेत्रातील मतदारांनी जो विश्वास टाकला तो शंभर टक्के पूर्ण होईल. त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. महिला रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे अयोग्य होते. आपण महिला रुग्णालयासाठी आठ वर्ष संघर्ष केला. आता लवकरच महिला रुग्णालय लवकरच सुरू होणार आहेत.निवडणूक होताच आठ गावे नगर परीषदेत येणार आहेत.

नवीन भंडारा नवीन संकल्प करणार आहोत. तीन वर्षात भंडाऱ्याचा चेहरामोहरा बदलणार. नवीन नागपूर उभा होणार आहे. त्याच धरतीवर नवा भंडारा निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहेत. शहरातील लोकांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा आमचा प्रयत्न आहे व राहील, असेही आ. नरेंद्र भोंडेकर यावेळी म्हणाले. पत्रपरिषदेत शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल गायधने, बाबू बागडे, नितीन धखाते, दिपक गजभिये, नरेंद्र बुरडे, रवी वाढई, शहर प्रमुख सतीश तुरकर, राजेश चोपकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *