महिला वाहकाची प्रवाशासोबत फ्रीस्टाइल

दै. लोकजन वृत्तसेवा लाखनी :- चिल्लर साठी महिला कंडाक्टरने प्रवाशाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना लाखनी बस स्थानकावर घडली. प्रवाशाला लाथा बुक्याने मारताना बस स्थानकावर प्रवाशांनी व्हिडिओ काढला व व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला. या घटनेचा प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशाला चिल्लर साठी मारहाण करणाऱ्या महिला वाहक वर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.

भंडारा जिल्ह्यातील महिला वाहक कडून मारहाणीचीदुसरी घटना आहे. आठ दिवस आधी एका महिला वाहक ने विद्यार्थिनीला केस ओढून मारहाण केल्याची घटना घडली होती. त्यानंतर ही घटना समोर आल्याने प्रवाशांन मध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे. मारहाण करणाऱ्या महिला वाहक वर तत्काळ गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवानकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *