अवैधरित्या वाहतुकीसाठी बिना नंबर प्लेट ट्रॅक्टरचा महापूर

 दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा ः- पोलीस स्टेशन सिहोराच्या हद्दीत व विविध रेती घाटावर अवैद्यरित्या रेतीची वाहतूक धडाक्यात सुरू आहे. यात बिना नंबर प्लेटचे ट्रॅक्टर भरधाव वेगाने रस्त्यावर धावत आहेत. यांच्यावर महसूल विभाग व पोलीस प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशी मागणी पंचायत समिती तुमसरचे उपसभापती सुभाष बोरकर यांनी एका प्रसिद्धी पत्रका अन्वये संबंधित विभागांना केली आहे.

उपविभागीय अधिकारी उपविभाग तुमसर, तहसीलदारतुमसर व पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन सिहोरा यांना दिलेल्या निवेदनातून वारपिंडकेपार, महालगाव, सोंड्या, देवसर्रा व इतर रेती घाटावर सुद्धा अवैधरित्या रेतीची वाहतूक धडाक्यात सुरू आहे. यात बिना क्रमांकाच्या ट्रॅक्टर व ट्रॉलीचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जात आहे. अवैद्य रित्या रेतीची वाहतूक करण्याची ठराविक वेळ रात्री बारा ते सकाळी सहा वाजेपर्यंत वाळूमाफ्यिांनी आखली आहे. आपला ट्रॅक्टर महसूल विभागाच्या किंवा पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्याला पकडता येणार नाही हा उद्देश ठेवून ट्रॅक्टर चालक-मालक अति जलद गतीने ट्रॅक्टर पळवून नेतात.

यात अपघात होण्याची शक्यतानाकारता येत नाही. घरकुल बांधकामाच्या नावाखाली अवैध रेतीचा उपसा धडाक्यात सुरू आहे. घरकुल बांधकामासाठी रेतीची वाहतूक होत असेल तर तो दिवसा कां नाही रात्रीलाच कां? म्हणजेच अवैधरीत्या रेतीचा उपसा सुरू आहे हे नाकारता येत नाही. म्हणजेच रेतीची वाहतूक ही अधिकृत नसून अनधिकृत असल्याचे सांगितले जाते. अति जलद गतीने धावणाऱ्या बिना नंबर प्लेटच्या ट्रॅक्टर ट्रॉलीने अपघात झाल्यास जबाबदार कोण असाही प्रश्न उपसभापती सुभाष बोरकर यांनी उपस्थित केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *