नागपुरात “आरक्षण बचाव’ साठी लाखो ओबीसींचा महाएल्गार

दै. लोकजन वृत्तसेवा नागपूर /भंडाराः- २ स्प्टेंबर रोजी राज्य सरकारने काढलेल्या जीआरनंतर ओबीसी समाजात अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यातून आत्महत्यांचे सत्र निर्माण झाली आहे. या आत्महत्या थांबविण्यासाठी सरकारने हा काळी जीआर रद्द करावा, या मागणीसाठी शुक्रवारी नागपुरात ओबीसींचा आरक्षण बचाव मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात विदर्भासह राज्यभरातून हजारो ओबीसी बांधव सहभागी झाले होते. ओबीसींच्या हक्काला धक्काला लावाल तर परिणाम वाईट होतील, असा इशारा या मोर्चाद्वारे देण्यात आला.

मराठा आरक्षणाच्या संदर्भात २ सप्टेंबरला राज्य शासनाने काढलेल्या शासन निर्णयानुसार हैदराबाद संस्थानातील गॅझेटमध्ये “कुणबी’ अशी नोंद असलेल्या मराठा व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हीच बाबपारंपरित ओबसी समाजाच्या असंतोषाचे कारणं ठरली आहे. ओबीसी नेत्यांचा ठाम आरोप आहे की, मराठी समाज सामाजिकदृष्टया मागास नाही आणि त्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात सामावणे म्हणजे ओबीसींच्या आरक्षणावर अतिक्रमण आहे. या विरोधात नागपूरमध्ये सकल ओबीसी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मोर्चाला आ. विजय वडेट्टीवार यांच्यासह अनेक ओबीसी नेत्यांनी मार्गदर्शन केले. मार्गदर्शनातून त्यांनी २ सप्टेंबरचा काळा जी. आर. रद्द करण्यासोबत ओबीसींच्या विविध प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यात याव्यात अशा मागण्या केल्यात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *