खैरी वलमाझरी येथे समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत नियोजन आराखडा बैठक
दै. लोकजन वृत्तसेवा साकोली :- हरित व पर्यावरणपूरक आदर्श व स्मार्ट ग्रामपंचायत खैरी वलमाझरी येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजना तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत समृद्ध गाव नियोजन आराखडा (युक्त धारा) याबाबत दि. ८ आक्टोबर २०२५ रोजी आदर्श सरपंच पुरुषोत्तम रुखमोडे यांचे अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.
यावेळी सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पंचायत समिती यंत्रणेचे अधिकारी तसेच इतर विभागातील यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी यांचे उपस्थितीत गाव नियोजन आराखडा अंतर्गत अभियान कालावधीतील व पंचवार्षिक आराखड्यात मनरेगा व इतर योजनांचे अभिसरणात गावनकाशनुसार शिवार फेरी करून निर्मल शोषखड्डा, जलतारा कामे, शेततळे, ढाळीचे बांध, विहीर व बोअरवेल पुनर्भरण, जनावराचा गोठा, कुक्कुटपालन, शेळीपालन आदी कामांची निवड ग्रामस्थांचे सूचनेनुसार प्राधान्यक्रमाने करून गावामध्येच रोजगार निर्माण करण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबतची गाव विकासाची कामे, नावीन्य पूर्ण उपक्रमात इकोटुरिझम प्लॅन वलमाझरी तलाव सदर नियोजनात समाविष्ट करण्यात आले.
याप्रसंगी सरपंच पुरुषोत्तम रूखमोडे, उपसरपंच सत्यपाल मरसकोल्हे, सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, पो. पा. शंकर कापगते, ग्रामपंचायत अधिकारी नरेश शिवनकर, पं. स. साकोली यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी गिमेकर, नंदागवळी, वडिचार, तरजुले, रामटेके, भेंडारकर, मेश्राम, गाडगीळ आणि बी. डी. दखणे वनपाल सामाजिक वनीकरण, राणे बिटरक्षक, कृषी सहायक नागोसे, सर्व रोजगार सेवक, ग्रामपंचायत कर्मचारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.









