भंडारा नगरपरिषद प्रभाग क्र. १० — तकिया वार्डात पत्रकार शमशेर खान ‘चर्चेच्या केंद्रस्थानी’

सामाजिक कार्य, पत्रकारितेतील सक्रिय भूमिका आणि जनतेशी घट्ट नात्यावर उमेदवारीची चर्चा जोरात
भंडारा – शहरातील आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणात नवे चेहरे उदयास येत आहेत. त्यातच नागरिकांमध्ये लोकप्रिय, जनसेवेसाठी सदैव तत्पर आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात ठसा उमटवलेले शमशेर खान हे प्रभाग क्रमांक १० — तकिया वार्ड येथून संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.
*सामाजिक कार्यातून घडलेलं नेतृत्व*
• शमशेर खान यांनी अनेक वर्षांपासून नागरिकांच्या दैनंदिन समस्या, स्थानिक प्रश्न आणि जनहिताच्या मुद्द्यांवर सातत्याने आवाज उठवला आहे.
• पाणीपुरवठा, वीज, आरोग्य आणि स्वच्छता यांसारख्या समस्या प्रशासनासमोर मांडल्या आणि निराकरणासाठी प्रयत्न केले.
• त्यांच्या उपलब्धतेमुळे आणि मदतशील स्वभावामुळे परिसरात त्यांनी विश्वासार्ह चेहरा निर्माण केला आहे.
*पत्रकारितेतून लोकांचा विश्वास जिंकला*
पत्रकार म्हणून शमशेर खान यांनी भंडारा शहरातील प्रत्येक घटनेवर वेगवान, अचूक आणि धाडसी पत्रकारिता केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फड़वनीस, फिल्म अभिनेता जैकी सराफ़, खासदार प्रफुल पटेल आणि मोठे उद्योगपती यांच्या हस्ते त्यांना ‘गोल्ड मेडल’ देऊन गौरविण्यात आले. तसेच महसूल मंत्री बावनकुले यांनी सम्मानित केला तसेच भंडारा जिला मध्य अनेक कार्यक्रमात अधिकरी व नेतागण आणि समाजसेवा के हस्ते ५०+ पुष्कर आणि सन्मानित करून विशेष गौरव केला गेला.
कोरोना काळात त्यांनी दिवस-रात्र नागरिकांना योग्य माहिती पुरवली, मदतकार्य केले आणि अनेकांना प्रशासनाशी जोडले.
भंडारा येथील वैनगंगा नदी पूरच्या परिस्थितीतही त्यांनी नागरिकांना रात-दिवस जागरूक करून पाल-पाल माहिती पुरवली, मदतीसाठी त्वरित पावले उचलली आणि पूरामुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
*स्थानिक प्रश्न सोडवण्यात ठोस पुढाकार*
तकिया वार्डातील तब्बल ४० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचे काम सुरु करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला.
या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाविषयी अधिक विश्वास निर्माण झाला आहे.
*’शमशेर ख़ान की ख़ास ख़बर’ या नावाने घराघरात ओळख*
शमशेर खान यांचे भंडारा शहरातील सर्व धर्म, समाज, संघटना आणि विभागांशी घनिष्ठ संबंध आहेत.
• कोणताही सण, घटना किंवा आंदोलन असो — ते स्वतः उपस्थित राहून बातमी जनतेपर्यंत पोहोचवतात.
• त्यांच्या प्रामाणिक आणि जलद रिपोर्टिंगमुळे त्यांना शहरात ‘कुनकुना ख़बर’ म्हणून ओळख मिळाली आहे.
• सर्व पार्टींचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ता तसेच भंडारा जिल्ह्यातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत ते मिळून काम करतात आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवतात.
*लोकांचा उमेदवार म्हणून वाढती चर्चा*
शमशेर खान यांचे प्रभागातील जनसंपर्क आणि काम करण्याची पद्धत नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद निर्माण करत आहे. त्यांना एक सक्षम, तत्पर आणि जनतेसाठी उपलब्ध उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे प्रभाग क्र. १० — तकिया वार्डातील निवडणुकीत त्यांचे नाव सध्या सर्वाधिक चर्चेत आहे.
पत्रकार, समाजसेवक आणि नागरिकांचा विश्वास संपादन केलेला चेहरा — शमशेर खान यांचं नाव आज तकिया वार्डात राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू बनलं आहे.
खास ओळख: ‘शमशेर ख़ान की ख़ास ख़बर’









