युवा सेनेचे लोकसभा अध्यक्ष भाजपच्या वाटेवर?, शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसणार?

*न. प. निवडणुकीच्या तोंडावर महत्वाची घडामोड
भंडारा: नगर परिषद निवडणुकांचे आरक्षण जाहीर होताच राजकीय उलथा पालथी चे चित्र दिसू लागले आहे. आ. नरेंद्र भोंडेकर यांचे घनिष्ठ समजले जाणारे शिवसेनेचे लोकसभा युवा सेना अध्यक्ष जॅकी रावलानी हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटासाठी नक्कीच ही बाब चिंतेची ठरू शकते.
भंडारा जिल्ह्यात दमदार लोकप्रतिनिधी म्हणून आ. नरेंद्र भोंडेकर यांची ओळख आहे. भोंडेकर यांच्या आतापर्यंत झालेल्या सर्वच निवडणुकांमध्ये जाकी रावलानी यांची भूमिका महत्त्वाची राहिल्याचे बोलल्या जाते. विधानसभा निवडणुकीत सूक्ष्म नियोजनात रावलानी यांचा वाटा महत्वाचा होता, असे सेनेचेच कार्यकर्ते सांगून जातात. शिवसेनेत रावलानी यांचे काम पाहून त्यांना भंडारा लोकसभेचे युवा सेना अध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली.
दरम्यान नगर परिषद निवडणुकीच्या आरक्षणानंतर या मैत्रीत वितुष्ठ आल्याची माहिती आहे. सुरु असलेली हिच परिस्थिती शिवसेनेला भंडारा जिल्ह्यात धक्का देणारी ठरण्याची शक्यता आहे. रावलानी भाजपाच्या मार्गांवर असल्याची माहिती असून काही वरिष्ठ नेत्यांच्या भेटीही झाल्याचे समजते. त्यामुळे एक दोन दिवसात भंडारा शहरात नवीन राजकीय घटना पुढे आल्यास नवल वाटायला नको. आगामी नगर पालिका निवडणुकीच्या तोंडावर सेनेला हा धक्का अधिक ताकद खर्ची घालण्यासाठी लावणारा ठरू शकतो, हे नक्की!









