नवीन शैक्षणिक धोरणावर राष्ट्रीय चर्चासत्र व अधिवेशन संपन्न

भंडारा: डाॅ. बाबासाहेब आंबेडकर टिचर्स ऑर्गनायझेशन द्वारा नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र व जिल्हा अधिवेशनाचे आयोजन इंद्रलोक सभागृह भंडारा येथे करण्यात आले होते.
या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन माऊली महाविद्यालय नागपुरचे प्राचार्य डॉ. ज्ञानेश्वर खडसे यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रातुम नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य व संघटनेचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश चिमणकर,सिनेट सदस्य डाॅ. श्रीकांत भोवते, डॉ.बाबासाहेब आंबेडकर टिचर्स ऑर्गनायझेशनचे जिल्हा अध्यक्ष डॉ. राहुल भगत,सचिव डॉ. रत्नपाल डोहने उपस्थित होते. यावेळी शोधनिबंध पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये डॉ. मनीष वानखेडे,डॉ. संतोष सुरडकर, प्रा. बुद्धघोष लोहकरे,डॉ. प्रमोद कुमार बागडे यांनी ‘भारतीय ज्ञान प्रणाली व राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील अभिजनवादी अजेंडा’या विषयावर आपली मते मांडली.’राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार प्राध्यापकांचा वाढलेला कार्यभार समस्या आणि समाधान’या विषयावर डॉ. राहुल भगत, डॉ. प्रदीप मेश्राम, डॉ. विनोद राऊत, डॉ. सुरेश खोब्रागडे लाखनी यांनी विस्तृत मार्गदर्शन केले .या अधिवेशनात बहुजनांच्या हिताचे हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे की नाही यावर साधक बाधक चर्चा झाली. अधिवेशनाच्या समारोपाच्या अध्यक्षस्थानी डॉ. राहुल भगत होते.याप्रसंगी डॉ.विकास जांभुळकर, डॉ. शैलेंद्र लेंडे, डॉ. छत्रपाल लांबकाने यांच्या उपस्थितीत संघटना बांधणी व पुढील दिशा व प्राध्यापकांपुढील आव्हाने व समस्या यावर चर्चा करण्यात आली. याप्रसंगी पीएच .डी प्राप्त 27 प्राध्यापकांचा सत्कार करण्यात आला. या चर्चासत्राला यशस्वी करण्यासाठी प्रा. सुभाष गोंडाने, डॉ.मंगेश वागदे, डॉ.ममता राऊत, डॉ. विकास मेश्राम, डॉ. महेश भैसारे ,डॉ. प्रमोद वरखडे, डॉ. चंद्रमणी भाऊते, डॉ.लालचंद्र रामटेके,प्रा. गायत्री शिरसाम, डॉ. कृष्णा पासवान, डाॅ. रेणुकादास उबाळे प्रा,अनिता बनसोड ,प्रा. अमिता पाटील, प्रा. राहुल भोरे,डॉ. श्वेता वेगड,डॉ.जगजीवन कोटांगले, डॉ. रक्षित बागडे ,डॉ. थूल,डॉ. प्रशांत जांभुळकर यांनी अथक परिश्रम घेतले.









