लॉयन्स क्लब ग्रीन सिटीच्या अध्यक्षपदी जॅकी रावलानी

भंडारा:-लायन्स क्लब ग्रीन सिटी भंडाराच्या अध्यक्षपदी जॅकी रावलानी यांची अविरोध निवड झाली.

लॉयन्स क्लब ग्रीनसिटी भंडाऱ्याची कार्यकारणी गठीत करून त्यांच्या शपथ ग्रहण सोहळा नुकताच आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी शपथ ग्रहण अधिकारी PMJF PDG विनोद वर्मा GAT तसेच प्रमुख पाहुणे म्हणून डिस्टिक गव्हर्नर 3234 H1 MJF भरत भलगट ZC शरद बिजवे मान्यवर उपस्थित होते. नव्या कार्यकारणी मध्ये अध्यक्षपदी जॅकी रावलाणी, सचिव पदी भीष्मकुमार रेवतकर, कोषाध्यक्षपदी भूपेश तलमले तर उपाध्यक्षपदी डॉक्टर मुकेश तोमर यांची निवड करण्यात आली. यावेळी माजी अध्यक्ष भक्ती मुरकुटे, माजी सचिव नितेश मोगरे, माजी कोषाध्यक्ष रजनी देसाई हे सुद्धा उपस्थित होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी लायन्स क्लब ग्रीन सिटी भंडाऱ्याच्या कार्याचे कौतुक करीत त्यांच्या पुढील सामाजिक कार्याला शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी साकुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन कल्पना जांगडे यांनी मानले. कार्यक्रमाला मंगेश मुरकुटे, मनोज साकुरे, तुषार इलमकर, संजय कुंभलकर,सुरेश धुर्वे, देवा किटे, घनश्याम जांगडे,सैफी खान,मिथुन चांदेवार,प्रवीण गभने, राजू देसाई,आशु वंजारी,मनीष वंजारी,वेदांत निंबार्ते, प्रिया रावलाणी, दीपा मोगरे,सविता तूरकर अलविना खान, पूजा तोमर, किरण किटे, ममता इलमकर, सारिका तलमले, शारदा रेवतकर, मीनाक्षी मल्होत्रा यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *