१० ऑक्टोंबरच्या नागपूर येथील ओबीसी मोर्चात सहभागी व्हा
दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- दि. १० ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता यशवंत स्टेडियम नागपूर (पटवर्धन ग्राउंड) वरून संविधान चौकापर्यंत सकल ओबीसी समाजाचा भव्य मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. भंडारा जिल्ह्यातून २५ हजार ओबीसी बहुजन बांधव सामील होतील. ओबीसींच्या सर्व संघटना, जातीय संघटना, मित्र ंसघटना, बहुजनातील संघटना व संस्था यात सामील होणार आहेत. ओबीसी बांधवांनी या मोर्च्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ओबीसी संघर्ष समितीचे मुख्य समन्वय सदानंद इलमे यांनी आज विश्रामगृह भंडारा येथे घेतलेल्या पत्रपरिषदेतून केले.







