भंडारा जिल्ह्यातील ४ नगरपरिषदांचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर
दै.लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व साकोली या चार नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठीची आरक्षण सोडत बुधवार, ८ ऑक्टोबर रोजी जाहीर झाली. यामध्ये प्रभागातील ५० टक्के जागा महिलांना राखीव ठेवण्यात आल्याने अनेक इच्छुकांचा ‘करेक्ट कार्यक्रम’ झाल्याने मोठा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे आरक्षण सोडतीनंतर हे इच्छुक शर्यतीतून बाहेर पडले आहेत. नव्याने जाहीर झालेल्या प्रभागांमध्ये मोठे फेरबदल झाल्याने शहरातील अनेक दिग्गजांचा चांगला कस लागणार आहे. तर आरक्षण सोडत झाल्यावर गटा-तटाने आपला प्रभाग सुरक्षित करण्यासाठी होणाखया घडामोडी पाहण्यासाठी मतदाररुपी जनता उत्सुक आहेत.
सोडतीनंतर आता अनेकांनी प्रभाग निश्चित करून नगरसेवक पदासाठी फिल्डिंग लावण्यास प्रारंभकेला आहे. सोडतीमधून काहींना दिलासा तर काहींचे आरक्षणामुळे अवसान गळाले आहे. चारही शहरातील अनेकप्रभागात फेरबदल झाले आहेत. त्यामुळे दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यात गट-तट उफाळून येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
फेरबदल हे अनेक विद्यमान आणि इच्छुकांना डोकेदुखी ठरणार आहे. त्यामुळे राजकीय आणि गटा-तटाचा समतोल साधत निवडणूक लढावी लागणार असल्याची चिन्हे आतापासून दिसत आहे.
जिल्ह्यातील भंडारा, तुमसर, पवनी व साकोली या चार नगरपरिषदेच्या एकूण जागांपैकी तब्बल ५० टक्के जागांवर महिलांसाठी आरक्षण आहे. येत्या निवडणुकीत महिला प्रतिनिधित्व एका जागेने तरी जादा असणार आहे. यावेळी प्रभागात महिलाना संधी जास्त मिळणार आहे. तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातप्रभावी काम करणाक्तया महिलांना आणि निवडणुकीसाठी आर्थिक रसद पुरवणाक्तया इच्छुकांना यावेळी स्थान मिळण्याची चर्चा सुरू झाली आहे.







