जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपले
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- भंडारा शहरात तसेच बाजूबाजूला रविवारी दुपारी दोन वाजेपासून पावसाने जोरदार दणका दिला. विजांच्या कडकडाट अन् ढगांच्या गडगडाटासह झालेल्य वादळी पावसाने शहरात ठिकठिकाणही तलाव साचले. रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले. ठिकठिकाणी झाडे व फांद्या कोसळण्याच्या घटना घडल्या. जिल्ह्यात हवामान खात्याकडून तीन दिवस पावसाचा “यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला असून रविवारी अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळी कडाक्याची उन्ह होते. उकाडावातावरणात जाणवत होता.
दुपारी दोन वाजेपासून जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह सुरु झाला. रात्रीपर्यंत हा पाऊस सुरुच होता. सगळीकडे अंधार पसरला होता. भर दुपारी रस्त्यावर सुकसुकाळ पसरला होता. आज रविवारी भंडारा शहरात आठवडी बाजार होता. अचानक पडलेल्या पावसाने धांदल उडाली. अनेकांच्या दुकानावरील छतउडाले. जनजीवन विस्कळीतझाले. सखल भागात पाणी साचले होते. जे. एम. पटेल महाविद्यालयासमोरच्या रोडवर पाणी जमा झाले होते. शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने उभ्या पिकांचे अनोनात नुकसान झाले. धान पिवक जमिनदोस्त झाले.हलक्या धानाच्या कापलेल्या कडपा पाण्यात सापडल्या. काही ठिकाणी कडपा पाण्यावर तरंगात होत्या. वादळामुळे ठिकठिकाणी झाडे व फांद्या कोसळल्या होत्या.







