शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे रामदास कदम चा निषेध
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भंडारा तर्फे आज दि. ५ ऑक्टोंबर २०२५ रोज रविवारला निषेध आंदोलन घेण्यात आले. दोन दिवसांपूर्वी मुंबईतल्या गोरेगाव मधील मेरेको सेंटर येथे गद्दार सेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये बोलताना रामदास कदम यांनी वंदनीय शिवसेनाप्रमुख त्यांच्या मृत्यू संदर्भात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांवर खोटे नाटे आरोप, बेताल वक्तव्य करून आपल्या वृत्तीच्या परिचय दिला. त्याच्या निषेध करण्यासाठी आज भंडारा शहरात शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय चौक येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नारेबाजी करून निषेध नोंदविला.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे, तालुकाप्रमुख तिलक सार्वे, युवा सेना जिल्हा अधिकारी श्रीकांत मेश्राम, शहर प्रमुख राकेश आग्रे, शहर संघटक मयूर जोशी, उप तालुका प्रमुख गुरुदेव साकुरे, धनराज बाभरे, चित्रांगंद सेलोकर, रोहित बनसोड, बालकदास परतेती, गोपीचंद गोमासे, रसिक खोब्रागडे, उमेश बुरडे, अतुल कातोरे, अक्षय रोटके, सुबद लाडे, संकेत गोमासे, अक्षय मोगरे, मयूर शनवारे, मंगेश मेश्राम, रोहित चाचेरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.







