विश्व हिंदू परिषदेच्यावतीने विजयादशमीनिमित्त शस्त्रपूजन

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- विजयादशमी निमित्त विश्व हिंदू परिषद भंडारा जिल्हा, अखिल क्षत्रिय समाज भंडारा, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान भंडारा विभाग यांच्यावतीने भंडारा शहरातील खांबतलाव येथे राणी लक्ष्मीबाई पुतळा परिसरात ५१ फुट भगवा ध्वजारोहण तसेच शस्त्र पूजन करण्यात आले. सनातन हिंदू धर्माचे प्रतिक असलेल्या भगवा ध्वजाचे पूजन विंहिपचे जिल्हाध्यक्ष जॅकी रावलानी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जॅकी रावलानी यांनी हिंदू धर्मातील शस्त्र पूजनाचे महत्त्व सांगितले.

यावेळी अखिल क्षत्रियसमाज भंडारा चे ठा. राजीवसिंग शक्करवार, ठा. ललितसिंग बच्चिल, ठा. दलपत सिंग, ठा. विवेकसिंग बच्चिल, श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान चे पदाधिकारी आकाश बावनकुळे, हर्षल जावळकर, विनायक बावनकुळे, यश आबडकर, विंहिप नगर अध्यक्ष कृष्णा हतीमारे, जिल्हा कोषाध्यक्ष मनोहर हे़डाऊ, दीपक झंवर, मनोज मुतकलवार उपस्थित होते. विंहिपचे जिल्हा सहमंत्री प्रकाश पांडे व ठा. विनय सोलंकी यांनी शस्त्र पूजनाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रम शेवट सकल हिंदू समाज द्वारा शस्त्र पूजन व उपस्थित मातृशक्ति सौ प्रीति पांडे, सौ. दीक्षा अग्रवाल, सौ. जया कच्छवाहा, सौ अर्चना बच्चिल, सौ. गौरी पांडे, विंहिप जिल्हा सह संयोजिका मातृशक्ति सौ. ममता दलाल, नगर सह संयोजिका सौ सुवर्णा देशकर यांच्यावतीने “भारत माता ची आरती’ म्हणून करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन भंडारा नगर सह मंत्री विहिप अनिल डोंगरवार, शशिकांत वैद्य यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन भंडारा नगर मंत्री राकेश सेलोकर, जिला प्रचार प्रसार आयाम चे देवेंद्र कोहा़ड, साहिल भिवग़डे, शिवानंद चेपे, निखिल भजनकर, चिन्मय आंबेकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *