दसरा मैदानाला गिळण्याचा प्रयत्न हाणून काढू
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- विजयादशमी उत्सव हा सनातन धर्मातील महत्वाचा सण आहे आणि याचे आयोजन गेल्या २७ वर्ष पासून भंडाराच्या दसरा मैदानात केल्या जाते. परंतु काही लोक या आयोजनवर डोळा ठेऊन आहेत. ज्या करीत या दसरा मैदानाला गिळण्याचा प्रयत्न करीत आहे. जो कधीच पूर्ण न होऊ देण्याचे वचन आम. नरेंद्र भोंडेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिले. ते स्थानीय शास्त्री नगर येथील दसरा मैदानात पंजाबी समाज नव युवक मंडळ तर्फे आयोजित विजया दशमी उत्सवच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. गेल्या २७ वर्षा पासून होत असलेल्या या दसरा उत्सवाचे आयोजन पंजाबी समाज नाव युवक मंडळ व आम. नरेंद्र भोंडेकर मित्र परिवार तर्फे करण्यात आले होते.
याला संबोधित करतांना आम. भोंडेकर पुढे म्हणाले की रावण दहन याचा अर्थ रावणाला जाळणे नाही कारण रावणाला कुणी बघितले नाही. आपण जे जाळतो तो रावण नाही रावणाची प्रतीकृती आहे ज्यात समाजातील वाईट वाईट प्रवृत्तीला नष्ट करणे गरजेचे आहे. हे त्यांच्या करीत संज्ञा पलीकडे आहे जे या उत्सवळ बंद करायचा कट रचतात. २०१४ ते २०१९ या दरम्यान मी आमदार नसतांना या मैदानाला लहान करण्यात आले आणि आता विरोधक संपूर्ण मैदान गिळण्याची तयारी करीत आहे, परंतु आम्ही हे होऊ देणार नाही. पंजाबी समाज पुढे अविरत हा आयोजन करत राहतील आणि आम्ही त्यांच्या सोबत राहू अशी हमी आमदार भोंडेकर यांनी दिली. सोबतच त्यांनी भंडाराच्या होत असलेल्या विकास बद्दल सांगितले की आज लोक शहरातील रस्त्या करीत चर्चा करतात. परांती रास्ते फोडणे ही विकसचीच गरज होती. सिवरेज लाईन आल्याने नगरिकांनाच याचा लाभ मिळेल आणि आता शहरातील रास्ते लवकरच बनवायला सुरू करण्यात येईल. कार्यकम दरम्यान विशेष आकर्षण म्हणून इन्डियन आईडल विजेता वैशाली रायकवार यांनी श्रोतानणा आपल्या भाकीगीतांनी मंत्रमुग्ध केले. या वेळी उद्घाटक म्हणून विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा अध्यक्ष जॅकि रावलाणी, खा. प्रशांत पडोळे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल गायधने, लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभालकर, उप जिल्हा प्रमुख सुरेश धुर्वे, शहर प्रमुख राजेश चोपकर, उद्योजक अभय भागवत, उद्योजक पंकज सारडा, भोंडेकर शिक्षण संस्थेच्या सचिव डॉ. अश्विनी भोंडेकर, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सविता तुरकर, भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची संचालिका आशा गायधने, पूजा कुंभालकर, विजयादशमी उत्सव समिति चे अध्यक्ष खेमराज चड्डा, सचिव राजेंद्र आनंद, कोषाध्यक्ष भरत मल्होत्रा, सदस्य मनीष मेहता, ललित आनंद, आश्विन मेहता, गुलशन चड्डा, महेश ठाकूर व समस्त विजयादशमी उत्सव समिति चे पदाधिकारी उपस्थित होते.







