गणेश गायधनेची आंतर विद्यापीठ कबड्डी संघात निवड
दै. लोकजन वृत्तसेवा सिहोरा:- आर्टस कॉलेज सिहोरा येथील बी.ए. प्रथम वर्षाचा विद्यार्थी गणेश शिवदास गायधने याची राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, नागपूर विद्यापीठाच्या कबड्डी संघात कर्णधारपदी निवड झाली अहे. गणेश हा १ आक्टोंबरला मेडीक्यॉप युनिवर्ससिटी इंदौर येथे होण्या-या पश्चित क्षेत्रीय आंतर विद्यापीठ संघाचा प्रतिनिधीत्व करणार आहे.
गणेश गायधने हा भंडार जिल्हाचा राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आहे. त्याच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे अध्यक्ष दिलीपराव सोमनाथे, प्रा. डॉ. सचीन चापले, शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉ. जयकुमार क्षिरसागर, डॉ. मंजूषा समर्थ, डॉ. मदन प्रधान, डॉ मनोज सरोदे, डॉ. चंद्रशेखर भेजे, डॉ. प्रेमा कुंभलकर, प्रा. रेणुका पटले, प्रा. राजेश अंबुले, प्रा. कु. साक्षी मिश्रा, अविनाश हेडावू, कार्तीक टेभूर्णे, प्रकाश उके, मनसुरलाल मरस्कोल्हे, राजकुमार गभने, कु. शारदा वैरागडे, श्रीमती सोनाली कुंभलकर व खेळाडू विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद अभिनंदन केले.







