खड्डयात बेशरमाचे झाड लावून महाविकास आघाडीचे आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर ः- तुमसर-मोहाडीभंडारा राष्ट्रीय महामार्गावरील रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्याचा निषेध म्हणून महाविकास आघाडीच्या माध्यमातून खड्डयांमध्ये बेशरमाचे झाड लावत आंदोलन करण्यात आले. तातडीने रस्त्यांचे कामे पूर्ण करावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. तुमसर-भंडारा राज्य महामार्ग हा राष्ट्रीय महामार्गामध्ये सामाविष्ट होऊन तीन ते चार वर्षे झाले आहेत. या रस्त्याचे कामे बऱ्याच वर्षांपासून करण्यात आले नाही. भंडाऱ्याकडे जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली आहे.

तुमसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरील रस्त्यात मोठे- मोठे खड्डे पडलेले असल्याने नागरिकांना वाहतूकीचा त्रास होत आहे. त्यामुळे त्या खड्ड्यात बसून बेशरमची झाडे लावून निषेध केला.या आंदोलनात उपसरपंच पवन खवास यांनी युती सरकारच्या विरोधात व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निषेधार्थ खड्यात बसून निषेध दर्शवीला. यावेळी माजी आमदार चरण वाघमारे, पं. स. उपसभापती हिरालाल नागपुरे, शिवसेना ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख अमित मेश्राम, प्रदेश सचिव जय डोंगरे, युवक काँग्रेस तुमसर शहर कार्याध्यक्ष दिपक लुटे, नरेंद्र शेंडे, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रमोद कटरे, सरादु सिंगाडे, ज्ञानेश्वर वासनिक, अश्विन देशमुख, बाललचंद बोंद्रे, नावेद शेख, सुलभाताई हटवार आदींनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *