विविध आयोजनासह पवनी महोत्सवाचा समापन
दै. लोकजन वृत्तसेवा पवनी :- पवनी येथे आयोजित होत असलेल्या विदर्भ काशी पवनी महोत्सवाचे आज समापण करण्यात आले. पाच दिवसीय या महोत्सव दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले, ज्यात मॅरथॉन दौड, स्टँडिंग कॉमेडी चा बादशाह सुनील पाल व भजन गायक शहनाज अख्तर हे पवनी करीता आकर्षण ठरले. आज या महोत्सवाचे समापण गरबा व दांडिया स्पर्धे ने करण्यात आला. नवरात्रोत्सवाचे अवचित्य साधत २६ सप्टेंबर पासून पाच दिवसीय ङ्गविदर्भ काशी पवनी महोत्सवङ्घ सुरू करण्यात आला. आम. नरेंद्र भोंडेकर मित्र परिवरा तर्फे आयोजित मॅरथॉन दौड मध्ये ५०० पेक्षा अधिक स्पर्धकांनी भाग घेतला.यात विजयी झालेल्या स्पर्धकांना स्मृतिचिन्हे व नगदी पुरस्कार देऊन सम्मानीत करण्यात आले.
याच दिवशी सायंकाळी ६ वाजता महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. पवनी येथील श्री चंडिका माता मंदिर येथे महा आरतीने या महोत्सवाची सुरुवात करण्यात अली. या वेळी आ. नरेंद्र भोंडेकर यांनी उपस्थित राहून महोत्सवाचे उद्घाटन केले.महोत्सव दरम्यान शनिवारी सकाळी रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या करिता संस्कार भारती आणि पोस्टर रंगोली असे दोन विभाग पाडण्यात आले होते, ज्यात विजयी स्पर्धकांना स्मृतिचिन्हे व नगदी पुरस्कार प्रदान करण्यात आले. सायंकाळी ७ वाजता सिने कलाकार व दि ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज शो चे विजेता सुनील पाल यांच्या कॉमेडी शो ने पवनीवासीयांना मनसोक्त हसविले. हा शो पवनी येथील नूतन दुर्गा उत्सव मंडळ चावडी मैदानात आयोजित करण्यात आला होता. याच प्रमाणे सोमवारी सायंकाळी सुप्रसिद्ध भजन गायिका शहनाज अख्तर यांची भजन संध्या ने संपूर्ण पवनी शहर श्री राममय झाले. वरील संपूर्ण आयोजन आम. नरेंद्र भोंडेकर मित्र मंडळ, शिवसेना, युवा सेना तसेच महिला आघाडी द्वारे करण्यात आले होते.







