भंडारा जिल्ह्यातील जनता दरबारातील तक्रारींबाबत पालकमंत्री घेणार आढावा

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामिण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यावर पालकमंत्री जनता दरबारी अभिनव संकल्पनेची सुरुवात केली. आठ १५ आणि २२ सप्टेंबर रोजी तहसील कार्यालयात जनता दरबार घेण्यात आली व २३ सप्टेंबर रोजी पालकमंत्री पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच घेण्यात आला. भंडारा जिल्ह्यातील पालकमंत्री जनता दरबारातील तक्रारींवर मंत्रालयात आढावा होणार आहे. मंत्रालयातून वीसी द्वारे भंडारा जिल्ह्यातील सर्व विभागप्रमुख या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

ही बैठक मंगळवार, दि. ३० सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता मंत्रालय, मुंबई येथे पालकमंत्री महोदयांच्या दालन क्रमांक २४१ येथे पार पडणार आहे. या बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा यांच्याकडून करण्यात आले असून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भंडाऱ्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

यात अपर मुख्य सचिव महसूल व वन विभाग, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच नगरपरिषद मुख्याधिकारी यांचा समावेश आहे. ८ सप्टेंबरपासून जिल्ह्यात सुरू झालेल्या पालकमंत्री जनता दरबार उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून १५ ,२२ व २३ सप्टेंबर रोजी झालेल्या दरबारात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात आपापल्या तक्रारी मांडल्या. आतापर्यंत प्राप्त झालेल्या ४८८ तक्रारींपैकी २४० तक्रारींचा निपटारा करण्यात आल्याची माहिती पालकमंत्री डॉ. भोयर यांनी दिली आहे. पालकमंत्री डॉ. पंकज भोयर म्हणाले की, पालकमंत्री जनता दरबार हा उपक्रम सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी राबविण्यात येत आहे.

सर्व अधिकाऱ्यांनी या दरबाराला गांभीर्याने घेऊन नागरिकांच्या तक्रारींचा जलद गतीने निपटारा करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. हा उपक्रम सातत्याने राबविला जाणार असून नागरिकांनी दर सोमवारी तहसील कार्यालयात हजेरी लावून आपल्या समस्या मांडाव्यात व त्यांचे निराकरण करून घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. बैठकीत दरबारातील प्रलंबित तक्रारींवर सखोल आढावा होणार असून, त्यावर कार्यवाही करण्यासाठी ठोस निर्णय अपेक्षित आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *