साकोलीच्या “फॉर्मसिस्ट’ रॅलीत झाले वकीलही सहभागी

दै. लोकजन वृत्तसेवा साकोलीः- जागतिक फॉर्मसिस्ट दिवस (२५ सप्टेंबर) निमित्ताने शहरात साकोली मेडीकल असोसिएशन कडून निघालेल्या भव्य “फॉर्मसिस्ट’ रॅलीत न्यायालयाचे वकीलही सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येथे रक्तदान शिबीर व सेवानिवृत्त औषधी विक्रेत्यांचा सत्कार समारंभ संपन्न झाला. तर येथे जिल्हा अन्न व औषधी प्रशासन अधिकारी सुद्धा उपस्थित होते. जागतिक फॉर्मसिस्ट दिन प्रसंगी बाजीराव करंजेकर फॉर्मसी व इंजिनिअरींग कॉलेज येथे आयोजन प्रसंगी जिल्हा औषधी निरीक्षक मोनिका मोहोड, वैनगंगा शिक्षण संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, प्राचार्य आतिश शहारे, प्रा. चंद्रशेखर चकोले, प्रा. भोजराम सातपुते, प्रा. गहाणे, मेडीकल असोसिएशन अध्यक्ष हिरालाल पारधीकर, प्रकाश गजापुरे, स्मिता राऊत, लता बावनकुळे व इतर हजर होते. यानिमित्त रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले.

ही फॉर्मसी कॉलेज विद्यार्थ्यांची भव्य रॅली न्यायालयापुढे येताच अधिवक्ता संघाने स्वागत केले व यात सहभागी झाले. यात बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. बी. एन. संग्रामे, ॲड. अण्णा परशुरामकर, ॲड. अनिल पटले, ॲड. के. डी. कापगते, ॲड. घोडीचोर आदींनी सहभाग नोंदविला. कॉलेज सभागृहात रक्तदान शिबीरात मेडीकल असोसिएशनच्या सदस्यांनी सुद्धा रक्तदान केले.

जिल्हा औषधी निरीक्षक मोनिका मोहोड ह्या भाषणात म्हणाल्या की, हे साकोलीत प्रथमच आयोजन करून येथील मेडिकल असोसिएशन अगदी कौतुकास पात्र ठरले आहे. समाजाला तुमची व तुमची समाजाला अत्यावश्यक सेवांसाठी २४ तास गरज आहे. येथे शहरातील सेवानिवृत्त औषधी विक्रेत्यांचा अतिथींच्या हस्ते मानचिन्ह देत सत्कार करण्यात आला. जागतिक फॉर्मसिस्ट दिवस यशस्वीपणे साजरा करण्यासाठी साकोली केमिस्ट अँड ड्रगिस्ट संघातील संजय चांदेवार, रूपम गुप्ता, विशाल परशुरामकर, पुनिश गायधनी, पद्माकर बोरकर, प्रकाश कापगते, गुणीराम बिसेन, केतन तिरपुडे, वैभव करीये, रूपेश करंजेकर, चंद्रशेखर दोनोडे, सोहेल पठाण, लोकेश पारधीकर, बलराज नंदेश्वर आदींनी विशेष सहकार्य केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *