तुमसरमध्ये अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर:- शारदा विद्यालय, तुमसर शाळेजवळील भिंतीलगत दिनांक २३ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी सुमारे ६.४५ वाजता एक अनोळखी पुरुष पडलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यास तात्काळ नेताजी सुभाषचंद्र बोस शासकीय उपजिल्हा रुग्णालय, तुमसर येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून तो मृत अवस्थेत असल्याचे घोषित केले.

मृत व्यक्तीचे वय अंदाजे ४० वर्षे, चेहरा लांबट, वर्ण निमगोरा, बांधा सळपातळ, केस काळे व लांब वाढलेले, उंची अंदाजे ५ फूट ३ इंच, अंगावर निळ्या रंगाची पँट होती. परिसरातील लोक त्याला “चव्वनी’ किंवा “मोती’ या नावाने ओळखत असत, मात्र त्याची खरी ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस स्टेशन, तुमसर येथे मर्ग नोंद करण्यात आली आहे. कोणासही सदर इसमाबाबत माहिती असल्यास कृपया पोलीस स्टेशन, तुमसर येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पोलीस उप निरीक्षक पुरुषोत्तम राठोड करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *