भंडाऱ्यात महिषासुर मर्दिनी स्तोत्र पठण व लाठीकाठी प्रात्यक्षिकाचा उत्साह
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा:- भक्तिभाव, परंपरा आणि शौर्य यांचा अनोखा संगम साधणारा महिषासुर मर्दिनी स्तोत्र पठण व लाठीकाठी शक्तिप्रदर्शन कार्यक्रम दि.२४ सप्टेंबर २०२५ रोजी, भंडारा शहरात पार पडला. शुभांगी सुनील मेंढे यांच्या पुढाकाराने व विश्वमांगल्य सभा तर्फे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम तारांगण सामाजिक व क्रीडा मंडळ, लक्ष्मी लॉन भंडारा व सृष्टी नेचर क्लब लाखनी महोत्सव लाखनी, स्प्रिंग डेल स्कूल भंडारा, विहिप धर्मशस्त्र त्रिशूल दिक्षा समारोह, नूतन कन्या शाळा भंडारा, साई संकल्प गरबा उत्सव भंडारा येथे मोठ्या उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात सुरुवातीला महिषासुर मर्दिनी स्तोत्राचाएकत्रित पाठ होऊन वातावरण भक्तिरसाने भारले. त्यानंतर चमूने लाठीकाठी प्रात्यक्षिक सादर करीत, दमदार हालचाली, शिस्तबद्ध सादरीकरण आणि ताकदीचे प्रदर्शन यामुळे उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली. या प्रात्यक्षिकातून भारतीय पारंपरिक युद्धकलेचे दर्शन घडले तसेच शौर्य आणि महिला सक्षमीकरणाचा प्रभावी संदेश देण्यात आला.
विशेषतः महिलांनी या कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. प्रात्यक्षिकामुळे उपस्थितांमध्ये जोश निर्माण झाला. आयोजकांनी या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करून समाजातील सांस्कृतिक व पारंपरिक मूल्यांची जपणूक केल्याचे जाणवले. कार्यक्रमानंतर उपस्थित मान्यवर व नागरिकांनी विश्वमांगल्य सभेचे संपर्क प्रमुख शुभांगी सुनील मेंढे यांचे अभिनंदन व आभार व्यक्त केले. याप्रसंगी सर्वश्री माजी खा. सुनिल मेंढे, राजू राऊत, केशव इंगोले, प्रवीण राऊत, भाजपा महिला मोर्चा शहर अध्यक्षचंद्रकला भोपे, साधना त्रिवेदी, महेंद्र निंबार्ते, सूर्यकांत इलमे, प्रीती ब्राम्हणकर, रोशनी पडोळे, श्रद्धा डोंगरे, जया हिंगे, अर्चना श्रीवास्तव, बंटी तांडेकर, यश ठाकरे, ओजल शरणागत, विवेक खांबले, पप्पी खांबले, अक्षय कांबळे, अभय आदमने, अनुप हटवार, सोनू मोगरे, विपुल पराते, नयन वंजारी, आशिक चुटे मंडळातील समस्त सदस्यगण व मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित होते. तसेच उद्या दि. २६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता स्कूल ऑफ स्कॉलर भंडारा, दुपारी ०४ वाजता एम. बी. पटेल कॉलेज साकोली, रात्री ८ वाजता परेड ग्राउंड साकोली येथे पार पडणार आहे.









