अजर्ुनी मोरगाव तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ५ वर्षीय चिमुकला ठार

गोंदिया :- जिल्ह्यातील अजर्ुनी मोरगाव तालुक्यातील गोठणगाव इटियाडोह धरण जवळील असलेल्या ग्राम संजयनगर( बंगाली कॅम्प) येथे दबा धरून असलेल्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एका पाच वर्षे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवार २५ सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली.अंश प्रकाश मंडल (५) असे या घटनेतील मृतक चिमुकल्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंश प्रकाश मंडल (५) हा चिमुकला आणि त्याची आजी अर्चना झोडू मंडल यांच्यासोबत २५ सप्टेंबरच्या पहाटे ५ वाजेच्या सुमारास लघुशंकेला घराच्या बाहेर अंगणामध्ये आले असता दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्या ५ वर्षीय चिमुकल्यांवर हल्ला करून मानेला पकडून फरकटत नेले चिमुकल्याच्या आजीने आरडा ओरडा केली असता परिसरातील लोकांनी आवाजाच्या दिशेने धावून बिबट्याने फरकळत नेलेल्या ठिकाणी पोहचले असता बिबट्याने चिमुकल्या सोडून पळ काढला. जखमी मुलाला प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी येथे नेले असता डॉक्टरने चिमुकल्याला मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पिंकू मंडल यांनी सांगितले.

घटनेची माहिती वन विभागाला आणि पोलीस विभागाला प्राथमिक आरोग्य केंद्र केशोरी कडून देण्यात आली आहे. ५ वर्षे चिमुकला बिबट्याने मारल्याची घटना कानावर आल्याने सकाळी सात वाजेपासूनच संजय नगर येथील सर्व महिला पुरुष एकत्र येऊन प्रश्नाच्या विरोधात आक्रोश व्यक्त करत मुख्य रस्ता केशोरीनवेगाव मार्ग पूर्णपणे बंद करून रस्ता रोको करण्यात आलेला आहे. घटना घडली त्यावेळी मृत चिमुकल्यांचे वडील एक दिवसा पूर्वीच कामासाठी गुजरात येथे गेले होते. तर मृतक मुलाची आई आपल्या माहेरी गेलेली होती. गावकऱ्यांनी हल्ला केलेल्या बिबट्याला लवकरात लवकर पकडावे अशी मागणी केली आहे. काही दिवसांपूर्वीच २९ ऑगस्ट २०२५ ला इटियाडोह धरण येथे आपल्या कुटुंबा सोबत फिरायला गेलेल्या ४ वर्षीय मुलावर ही बिबट्याने हल्ला केला होता. तर २०२४ मध्ये गोठणगाव येथे मंडई उत्सव सुरू असतानाच सायंकाळी साडेपाच वाजता अंगणात असलेल्या लहान मुलावर सुद्धा हल्ला केल्याची घटना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *