जिल्हा बँकेला निधी कमी पडू देणार नाही – उपमुख्यमंत्री पवार

दै. लोकजन वृत्तसेवा भंडाराः- नुकताच नागपूरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा (अजितदादा पवार गट) चिंतन मेळावा झाला. खा. प्रफुल्ल पटेल यांच्या मार्गदर्शनात झालेल्या या मेळाव्यात पक्षाच्या भवितव्याविषयी चिंतन करण्यात आले. याप्रसंगी भंडारा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी अजितदादा पवार यांची भेट घेतली. त्याप्रसंगी सुनील फुंडे यांची पाठ थोपटतांना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी “कार्यकर्ता असावा तर असा’ हे गौरव उद्गार काढून फुंडे यांचा गुणगौरव केला. आणि येत्या काळात भंडारा जिल्हा बँकेला शासकीय योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधी कमी पडू देणार नाही याची ग्वाही दिली.

नागपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चिंतन मेळावा नुकताच पार पडला. त्यात खा. प्रफुल्ल पटेल यांचे मार्गदर्शन तर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे मुख्यमार्गदर्शन लाभले. त्याप्रसंगी पक्षाच्या भविष्यातील वाटचालीबद्दल चिंतन करण्यात आले. शिस्त ही पक्षाच्या भविष्यासाठी अतिशय महत्वाची हे सांगतांना अजितदादा पवार यांनी बेशिस्तीने वागणाऱ्या कार्यकर्ता, पदाधिकारी तसेच मंत्र्यांना सुध्दा कडक शब्दात सुनावले. मंत्रीपद जनतेचे कार्य करण्यासाठी पक्षाने दिले. हे सांगतांना आप-आपल्या मतदासंघात प्रत्येक मंत्र्याने जनतेमध्ये जावून शासनाच्या योजना राबविल्या पाहिजे. सोबतच जनताही आपली मायबाप आहे हे विसरता कामा नये. या भेटीत सुनील फुंडे यांचे गुणगान करतांना अजितदादा पवार यांनी फुंडे यांचे कौतूक केले आणि पाठ थोपटली. माझा कार्यकर्ता हा असा असावा हे प्रसंगी त्यांनी उपस्थितांना उद्देशून सांगितले. इतर जिल्ह्यातील जिल्हा बँकेत घोटाळे झाले.

परंतु भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची प्रगती आबादित ठेवून सुनील फुंडे यांनी बँकेला घोटाळ्यापासून दूर ठेवले. शासनाच्या सर्व योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचविल्या. पिक कर्जाच्या बाबतीत तर भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने सुर्वण मध्य गाठला. तितक्याच जोमाने पिक कर्जाची वसुली देखील केली. हे सांगायला दादा विसले नाही. मी जिल्हा बँकांना निधी कमी पडू देणार नाही हे ठसकावून सांगत असेच जनतेचे प्रेम अबादीत ठेवून तळागाळातील जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहचवाव्या जेणेकरून शासनाचे जनतेच्या विकासाचे उद्दिष्ट साध्य होईल. सोबतच पक्ष जनतेत अजून मजबूत होईल हे त्यांनी प्रकर्षाने संबोधले. नुकत्याच जिल्हा बँकेच्या निवडणूका आटोपल्या असून यात सहकार पॅनलला १७ जागांवर विजय प्राप्त झाला. सुनील फुंडे यांनी पुन्हा अध्यक्षपद देण्यात आले.

जिल्हा बँकेचे सलग २१ वर्ष अध्यक्षपद भूषवितांना सुनील फुंडे यांच्या नेतृत्वात बँकेची प्रगती आबादीत राहिली आहे. सर्वात जास्त पिक कर्ज देणारी जिल्हा बँक सोबतच सर्वात जास्त पिक कर्ज वसूल करणारी जिल्हा बँक या दोन्ही बाबतीत बँकेने सुर्वणमध्य गाठला आहे. सलग २१ वर्षाच्या नेतृत्वात फुंडे यांनी शासनाच्या प्रत्येक योजना बँकेच्या माध्यमातून शेतर्क?यांपर्यंत पोहचविल्याने जिल्हा बँकेला आता शेतकऱ्याची बँक असे संबोधण्यात येते. बँकेतील सतत होणारी प्रगती जिल्ह्यासाठी भूषावह झाली असून विदर्भ प्रांतासाठी जिल्हा बँकेने प्रशंसनीय कार्य केले आहे. आज जिल्हा बँक विदर्भात प्रतिष्ठीत बँक म्हणून नावारूपास आहे. प्रसंगी खा. प्रफुल्ल पटेल, माजी आ. व गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जैन, भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनिर्वाचीत संचालक प्रशांत पवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *