पाणंद रस्ते व सर्वासाठी घरे कार्यक्रम प्राधान्याने राबविणार – पालकमंत्री डॉ. भोयर

*सेवा पंधरवाडा कार्यक्रमात प्रतिपादन

*जनता दरबारातुन 240 तक्रारी निकाली

*जिल्हयात 7 नमो उदयान

*धान उत्पादकांना 114 कोटीचे वितरण लवकरच

भंडार दि.23 :-!पाणंद रस्ते व सर्वासाठी घरे हा कार्यक्रम प्राधान्याने राबविणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केले.

हेमंत सेलिब्रेशन येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय, भंडारा यांच्या वतीने “सेवा पंधरवडा” या उपक्रमाचा शुभारंभ आज पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले .यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे तसेच माजी खासदार सुनिल मेंढे ,जि.प पदाधिकारी आनंद मलेवार,रसीका रंगारी, कल्पना कुर्झेकर ,जिल्हाधिकारी सावनकुमार उपस्थित होते.यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की,लोकाभिमुख प्रशासन हे या शासनाचे ब्रीद आहे.त्यातुनच सेवा पंधरवाडा उपक्रम राबविण्यात येत आहे.या अंतर्गत पाणंद रस्ते व सर्वासाठी घरे कार्यक्रम प्राधान्याने राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात पाणंद रस्तेविषयक मोहीम (दि. १७ ते २२ सप्टेंबर) – या कालावधीत पाणंद व शिवार रस्त्यांना क्रमांक देणे, त्यांचे सर्वेक्षण करणे, गावाच्या नकाशावर चिन्हांकित करणे आणि पत्रकात नोंद नसलेल्या रस्त्यांची नोंद करणे यावर लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच, शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी संमतिपत्रे घेणे आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी ‘रस्ता अदालत’ आयोजित केली जाईल.
दुसऱ्या टप्प्यात ‘सर्वांसाठी घरे’ उपक्रम (दि. २३ ते २७ सप्टेंबर)- या टप्प्यात ‘सर्वांसाठी घरे’ या उपक्रमासाठी पूरक कार्यवाही केली जाईल. यामध्ये घरे बांधण्यासाठी उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जेहक्काने देणे, शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमनुकूल करणे व अतिक्रमण नियमित केलेल्या तसेच जमीन वाटप झालेल्या लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे वाटप करणे यावर भर दिला जाईल.
जनता दरबाराचे फलद्र्र्र्रुप म्हणजे 488 तक्रारीपैकी 240 तक्रारी निघाल्या आहेत. नागरिकांचा सकारात्मक असा प्रतिसाद या जनता दरबाराला मिळत आहे.जिल्हयात नगरपालीका आणि नगरपरिषदा क्षेत्रात 7 नमो उदयाने निर्माण करण्यात येतील.धान उत्पादकासाठी शेतक-यांकडुन 114 कोटी प्राप्त झाले असून लवकरच तो निधी शेतक-यांच्या खाती वर्ग करण्यात येईल,असेही त्यांनी आश्वासीत केले.
यावेळी आमदार नरेंद्र भौंडेकर यांनी जिल्हयाच्या विकासाला पालकमंत्री यांच्या दौ-यांमुळे गती मिळेल,असा विश्वास व्यक्त केला ,तर आमदार राजु कारेमोरे यांनी प्रशासनाने सेवा पंधरवाडयातील सेवा नागरिकांना देण्यासाठी हेड टु टेल काम करण्याची गरज व्यक्त केली.माजी खासदार सुनिल मेंढे यांनीही मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमात नागरिकांना उत्पन्न, अधिवास, रहीवास दाखल्यांचे वाटप पालकमंत्री श्री.भोयर यांच्या हस्ते करण्यात आले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *