आज पालकमंत्री डॉ. पंकज भोयर जिल्ह्यात

भंडारा ः- गृह (ग्रामीण) गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म, राज्यमंत्री तथा पालकमंत्री भंडारा जिल्हा डॉ. पंकज भोयर हे २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता भंडारा येथे येणार आहेत. लगेच अखिल सभागृह गणेशपूर भंडारा येथे आयोजित जिल्हा शिक्षक पुरस्कार व गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी १२.०० वाजता छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानारंतर्गत सेवा पंधरवाडा कार्यक्रमास उपस्थीती स्थळ : हेंमत सेलीब्रेशन,रॉयल पब्लीक स्कुल जवळ,नागपूर नाका भंडारा. यानंतर दुपारी २ वाजता शासकीय वाहनाने भंडारा येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *