पंचायत समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

दै. लोकजन वृत्तसेवा साकोली ः- साकोली पंचायत समितीची मासीक सभा दि. १९ सप्टेंबर रोजी पार पडली. या सभेनंतर पंचायत समिती सभापती ललित हेमने यांनी पंचायत समिती मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना अवांतर भाषेत अश्लील शिवीगाळ करून मानहानी केली. यामुळे पंचायत समिती सभापती जोपर्यंत माफी मागत नाही, तोपर्यंत कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरु केले आहे. कर्मचाऱ्यांच्या निवेदनानुसार, सभापतींनी मासीक सभा संपल्यानंतर पैसे घेतल्याशिवाय कोणतेही काम करित नाहीत, कोणीही दुधाने धुतलेले नाहीत.

दारु साठी मागेमागे येतात, अशा प्रकारच्या अशोभनिय भाषेत स्वत:चे कक्षात व कक्षा बाहेर कार्यालयाचे पडवित मोठ मोठया आवाजात ओरडून बोलून अशोभनिय भाषेत शिवीगाळ करून या शिवाय कार्यालयातील महिला अधिकारी/कर्मचारी उपस्थित असतांना शुध्दा अश्लील भाषेत शिवीगाळ केलेली आहे. ही बाब कार्यालयीन दृष्टीने अत्यंत अशोभनिय आहे व अधिकारी/ कर्मचारीऱ्यांचे आत्मसन्मान खच्चीकरण करणारी आहे. सदर प्रकरणामुळे अधिकारी/ कर्मचाऱ्यामध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. या घटनेचा अधिकारी व कर्मचारी यांनी तीव्र निषेध केला. सभापती जोपर्यंत घडलेल्या प्रकारा संबंधाने पंचायत समिती साकोली कार्यालयातील अधिकारी/कर्मचारी यांची जाहीर माफी मागत नाही तोपर्यंत दिनांक २२ सप्टेंबरपासूनअधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी यांनी लेखनी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सदर निवेदन आ. नानाभाऊ पटोले, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद भंडारा यांना देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *