जिल्ह्यातील ४ नगर परिषद व ३ नगरपंचायतचा “नामे उद्यान’ योजनेत समावेश
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- राज्य शासनाच्या नगर विकास विभागाच्यावतीने राज्यातील नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्रात नमो उद्यान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत भंडारा जिल्ह्यातील चार नगरपालिका व तीन नगर पंचायतचा समावेश करण्यात आला आहे. प्रत्येक शहरात उद्यान निर्मितीसाठी राज्य सरकारकडून एक कोटी रूपयांचे अनुदान दिल्या जाणार आहे, अशी माहिती भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी अदिली आहे.
सदर निधी वैशिष्टयपुर्ण योजनेतंर्गत दिल्या जाणार आहे. योजनेतंर्गतब विकसित करण्यात येणाऱ्या नमो उद्यानाची विभागीय स्तरावर स्पर्धा घेण्यात येणार आहे. प्रत्येक प्रशासकीय विभागातंर्गत तीन उद्याणाची निवड करण्यात येणार असून प्रथम नमो उद्याणाचा मान प्राप्त करणाऱ्या नगर परिषद व नगर पंचायतला ५ कोटी रूपयांचा तसेच व्दितीय व तृतिय स्थान प्राप्त करणाऱ्या नप व नपं ला तीन व दोन कोटीचा निधी वैशिष्टयपुर्ण योजनेतून मंजूर करण्यात येणार आहे. नप मार्फत सदर योजनेचे काम होणार आहे.









