२५ ला राष्ट्र सुरक्षा यज्ञ व धर्मशस्त्र दिक्षा समारोह

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- विश्व हिंदु परिषद भंडारा जिल्हा तर्फे “नशामुक्त भारत नशामुक्त युवा’ या अभियाना अंतर्गत दि. २५ सप्टेंबर रोजी मंगलमुर्ती सभागृह, खात रोड भंडारा येथे राष्ट्र सुरक्षा यज्ञ व जिल्ह्यातील युवा मुलांना, मुलींना व मातृशक्तींना धर्मशस्त्र दिक्षा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याची माहिती विहिंपचे जिल्हाध्यक्ष जॅकी रावलानी यांनी विश्रागृह भंडारा येथे घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली. जॅकी रावलानी पुढे म्हणाले, १७ वर्षानंतर भंडारा जिल्ह्यात संत श्री महामंडलेश्वर स्वामी श्री नागेंद्र ब्रम्हचारीजी महाराज व साध्वी दुर्गादिदी यांच्या उपस्थितीत सुरक्षा यज्ञ व धर्मशस्त्र (त्रिशुल) दिक्षाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रमुख वक्ता बजरंग दलाचे मुंबई क्षेत्र संयोजक विवेक कुळकर्णी प्रमुख अतिथी विहिंपचे विदर्भ प्रांत मंत्री प्रशांत तितरे यांच्यासहविशेष अतिथी उपस्थित राहणार आहेत.

या धर्मशस्त्र दिक्षा समारंभासाठी फार्म भरण्यात येत आहे. जिल्ह्यातील युवा बजरंगी, दुर्गा, मातृशक्ती अंदाजे १५०० च्या संख्येत उपस्थित राहणार आहेत. दि. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० वाजता शिवाजी स्टेडियम – पोस्ट ऑफिस चौक- गांधी चौक- हेडगेवार चौकखामतलाव चौक -मंगलमुर्ती सभागृह अशी मोटार बाईक रॅली काढण्यात येणार आहे. दुपारी १२ ते ३ पर्यंत राष्ट्र सुरक्षा यज्ञ, धर्मशस्त्र दिक्षा समारोह, दुपारी ३.३० वाजता मंगलमुर्ती सभागृह ते खामतलाव चौक-गांधी चौक- शितलामाता मंदिर असे धर्मशस्त्र पथसंचालन होणार असून शेवटी शितला माता मंदिरात महाआरती होणार आहे. सशक्त व समर्थ भारत व्हावा तसेच भारतातील युवा पिढीने नशामुक्त व्हावे व देश, देव व धर्म याच्या सेवेसाठी आपले सर्वस्च अर्पण करावा या उदात्त हेतुने सकल हिंदु समाजासाठी हा कार्यक्रम आयोजि करण्यात आला आहे. जिल्ह्यात समस्त हिंदु समाजाने या कार्यक्रमात उपस्थित राहुन संतांचे आशीर्वाद घ्यावे, असे आवाहनही जॅकी रावलानी यांनी केले आहे. पत्रपरिषदेला प्रकाश पांडे, डॉ. राकेश सेलोकर, राकेश सेलोकर, बजरंग दल जिल्हा संयोजक प्रदीप कहू, देवेंद्र कोहाड, सखल हिंदू समाजाचे राजकुमार भोजवानी व मयूर बिसेन उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *