मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यात छत्तीसगढमधून केले आरोपीस अटक

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- तुमसर व देव्हाडी येथील मोटारसायकल चोरास तुमसर पोलिसांनी छत्तीसगट मधून ताब्यात घेतले आहे. देव्हाडी रेल्वे स्टेशन परीसराचे समोरील किशोर किराणा दुकाणासमोरून देवेंद्र अशोक शहारे रा. आंबेडकर वार्ड देव्हाडी याची मो. सा. क्र. एम.एच.३६ एसी ५६३६ रॉयल इनफील्ड कंपनीची क्लासिक ३५० किमत ७० हजार रुपयाची चोरी झाली होती. पोलीस स्टेशन तुमसर येथे गुन्हा नोंद करण्यात आला. तुमसर रेल्वे कॉर्टरचे समोर पार्क करुन ठेवलेली मो. सा. क्र. एम. एच. ४२ बी. क्यू ५४५३ चोरी गेले बाबद पोलीस स्टेशन तुमसर येथे गुन्हा नोंद करण्यात आला. डी.बी. पथक यांनी सदर गुन्ह्याची घटणास्थळाची पाहणी करुन सी.सी. टी. व्ही फुटेज प्राप्त करुन सदर गुन्ह्यात चोरीस गेलेली मोटारसायकल सी.सी. टी. व्ही च्या फुटेजमध्ये एक इसम चोरी करतांनी दिसुन आला.

सदर चा इसम कुठुन आला याबाबद तुमसर रोड रेल्वे स्थानकाचे सी.सी.टी.व्ही ची पाहणी करण्यात आली सदर चा इसम हा गोंदिया च्या दिशेने येणाऱ्या ट्रेनने आल्याचे समजले. काही दिवसाने पोलीस स्टेशन तुमसर येथील डी. बी. पथकाला माहीती मिळाली की, पोलीस स्टेशन जामुल ता. भिलाई जि. दुर्ग राज्य (छ.ग.) येथे काही आरोपींना अटक करुन त्याचे कडुन महाराष्ट्र पासींगच्या मोटार सायकल हस्तगत करण्यात आल्याचे समजले तेव्हा पोलीस स्टेशन तुमसर चे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी तुमसर चे डी.बी. पथक यांना जामुल पोलीस स्टेशन भिलाई जि. दुर्ग राज्य (छ.ग.) येथे तात्काळ रवाना केले. जामुल येथील संबंधीत तपासी अधिकाऱ्यांशी संपर्क साधुन गुन्ह्यात चोरीस गेलेली मो. सा. रॉयल इनफील्ड कंपनीची बुलेट ३५० व तुमसर रल्वे कॉर्टरचे समोरुन चोरीस गेलेली मोटार सायकल बजाज पल्सर डिटेन करण्यात आल्याचे दिसुन आले. डी. बी. पथकाचे हवालदार शिवाजी कनोजिया डी.बी. पथकासह दुर्ग येथुन आरोपी सोहन अगनु यादव वय २० वर्ष रा. रु आबांधा ता. भिलाई जि. दुर्ग राज्य (छ. ग.) यास अटक करुन गुन्ह्यात चोरीस गेलेली दोन्ही मो. सा. ताब्यात घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *