प्रधानमंत्री मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजूंना अन्नदान व किराना सामानाचे वितरण
दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा ः- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या जन्मदिनानिमित्त भंडारा शहरात मयूर बिसेन मित्र परिवाराच्यावतीने सामान्य रुग्णालय परिसर व रेल्वे लाईन तकिया वॉर्ड झोपडपट्टी येथे काही गरजूना अन्नदान रूपात किराना कीटचे वाटप करण्यात आले. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वास्थ व दिर्घ आयुष्यासाठी बहिरंगेश्वर मंदिरात महामृत्युंजय मंत्र जाप व महाआरती करण्यात आली. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक नगर कार्यवाह पंकज हाडगे, भाजपा जिला अध्यक्ष आशुजी गोंडाने, भगवानचन्देवार, प्रसिद्ध उद्योगपति शामूजी धुत, विकास मदनकर, विहिप भंडारा जिला सह मंत्री प्रकाश पांडे, महेन्द्र मेंढे, प्रवीण मोहरिल, अमित वसानी, नंदु राजपुरोहित, राजकुमार भोजवानी, रोशन काटेखाये, गोपाल भोयर, अनिल डोंगरवार, देवेंद्र कोहाड, राकेश सेलोकर, कृष्णा हत्तीमारे, मनोहर हे़डाऊ, भूषन साखरवाडे, शशि वैद्य, मुल्कनवार उपस्थित होते.







