रासेयोच्या विभागीय समन्वयपदी प्रा. नरेश आंबिलकर

दै. लोकजन वृत्तसेवा मोहाडी :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने प्रा. नरेश आंबिलकर यांची विभागीय समन्वयकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रातुम नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांनी त्यांची ही नियुक्ती केली आहे.

नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात भंडारा जिल्ह्याच्या विभागीय समन्वयकपदाचे नियुक्ती पत्र रासेयोचे संचालक डॉ. सोपानदेव पिसे यांनी नटवरलाल जशभाई पटेल महाविद्यालय मोहाडीचे प्रा. नरेश आंबिलकर यांना दिले. रासेयोच्या विभागीय समन्वयकपदाच्या नियुक्तीचे श्रेय त्यांनी गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष वर्षा पटेल, सचिव राजेंद्र जैन व प्राचार्य डॉ. सुरेंद्र पवार यांना दिले आहे. त्यांच्या या नियुक्तीबद्दल राष्ट्रीय सेवा योजनेचे भंडारा जिल्हा समन्वयक डॉ. संजयकुमार निंबेकर, नटवरलाल जशभाई पटेल महाविद्यालय मोहाडीचे प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी रासेयो स्वयंसेवकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *